Tuesday, February 11, 2025

कोरीवडे सरपंचावरील जनतेतील अविश्वास ठराव मंजूर

आजरा, विकास न्यूजसेवा :

कोरीवडे (ता. आजरा) येथील लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील यांच्यावरील जनतेतील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. अविश्वास ठरावाच्या बाजूने 298 तर अविश्वास ठरावाच्या विरोधात 152 ग्रामस्थांनी मतदान नोंदवले. गटविकास अधिकारी ढमाळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

ग्रामपंचायत कारभारात विश्वासात घेत नसल्याबद्दल सहा सदस्यांनी लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. सदस्यांच्या अविश्वास ठरावाच्या मतदानात सहा विरुद्ध दोन मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यानंतर लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठरावासाठी मंगळवारी कोरीवडे गावातील मतदारांचे मतदान झाले. पहिल्यांदा 464 मतदारांनी आपली नोंदणी करून घेतली. यानंतर प्रत्यक्ष मतदानात 462 जणांनी मतदान केले. यापैकी 12 मते मतमोजणीत अवैध ठरवण्यात आली. वैध मतांपैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने 298 तर अविश्वास ठरावाच्या विरोधात 152 मते झाली.
====================

No comments:

Post a Comment

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला

मुंबई, न्यूज नेटवर्क : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 101 व्या वर्षी त्या...