आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
भारत सरकार विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तर्फे मुलभूत विज्ञान अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि नवा कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्स्पायर कॅम्प चे आयोजन करण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता निकष ही इयत्ता दहावीच्या बोर्ड 2024 परीक्षेत टॉप वन पर्सेंट विद्यार्थी असतील या शिबिरात सहभागी होण्याकरिता एसएससी बोर्ड परीक्षेत 93.6 टक्के तर सीबीएससी बोर्ड परीक्षेत 96 टक्के तर आयसीएससी बोर्ड परीक्षेत 97.83 टक्के किमान गुण असणे आवश्यक आहे या विद्यार्थ्यांनी अकरावी सायन्स शाखेत प्रवेश घेतलेला असाव.
संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ व विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसा आला यांच्या संयुक्त विद्यमाने 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डीएसटी डॅश इन्स्पायर कॅम्प संत राहुल कॉलेज कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरात आजरा महाविद्यालयातील राखी राजीव नवार, आहाना फिरोज मुराद, भक्ती पराग परुळेकर यांची निवड झाली होती. या पाच दिवशीय शिबिरात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र व अर्थ सायन्स या विषयावर व्याख्याने संवाद तसेच हँडसम ऍक्टिव्हिटी व प्रयोग प्रश्नमंजुषा चर्चासत्रे घेण्यात आली असे सांगितले.
सदर इन्स्पायर कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी मधील राखी नवार हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या शिबिरात घेण्यात आलेल्या देशभरातील आघाडीच्या संस्था मधील नामवंत शास्त्रज्ञ शिक्षण तज्ञ संशोधक यांची संवादात्मक सत्रे, तसेच विविध विषयावर चर्चा व प्रश्नमंजुषा यांचे आयोजन करण्यात आले होते. फिरोज मुराद हीने सदर शिबिरात हँडसम ऍक्टिव्हिटी व प्रयोगामध्ये तसेच व्यवहारिक अनुभव व वैज्ञानिक संकल्पनांची सखोल माहिती या शिबिरात वैज्ञानिक क्षेत्रातील तज्ञांशी विद्यार्थी यांचा संवाद घडवून आणण्यात आला विद्यार्थ्यांना अनेक संशोधन क्षेत्रे आणि सर्वोच्च भारतीय वैज्ञानिक संस्थांमध्ये उपलब्ध संशोधन सुविधा बद्दल माहिती देण्यात आली त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना झाला असे मनोगतातून सांगितले. भक्ती परुळकर हिने मनोगत व्यक्त करताना इन्स्पायर कॅम्प मध्ये आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ भटनागर पुरस्कार विजेते राष्ट्रीय तसेच केंद्रीय राज्य विद्यापीठे यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था मधील 15 तज्ञांचे त्यांच्या वैज्ञानिक अनुभवासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले असे मत व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयातून सदर कॅम्प साठी राखी राजू नवार, आहाना फिरोज मुराद, भक्ती परुळेकर या निवड झालेल्या विद्यार्थिनींनी इन्स्पायर कॅम्प मध्ये घेतलेल्या प्रशिक्षण व अनुभव महाविद्यालयातील विज्ञान शाखेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रयोगाद्वारे सादरीकरण केले सदर कार्यक्रमाचे आयोजन ज्युनिअर विज्ञान विभाग व विज्ञान आणि पर्यावरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्रद्धा कुलकर्णी यांनी केले. स्वागत प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले. आभार प्रा. शुभांगी सावंत यांनी केले. सूत्रसंचालन सागर फगरे यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एन. सादळे, प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, प्रा रागिणी राजमाने , प्रा. ज्योती कुंभार तसेच विज्ञान विभागाचे विद्यार्थि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
================
Subscribe to:
Post Comments (Atom)
परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment