आजरा, विकास न्यूजसेवा :
पाश्चात्त्य देशांशी संबंधित असलेला 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करून आजची तरुण पिढी भरकटत आहे. अशा प्रकारचे 'डे' हे युवा पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र असून यामागे मोठ्या आस्थापनांचे छुपे अर्थकारणही लपलेले आहे. यामुळे आर्थिक हानीसह या देशातील भारतीय संस्कृतीची अपरिमित हानी अशा चुकीच्या 'डे'मुळे होत आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून मोठ्या प्रमाणात तरुणाई कडून साजरा केला जातो हा दिवस साजरा करत असताना चुकीच्या प्रथा वा चुकीच्या घटना घडत असतात. हा दिवस साजरा करण्यासाठी तरुणाई प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल, कॅफे, बागा, चित्रपटगृहे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जमा होतात यातून अनेकदा वाईट प्रसंग घडले आहेत यामुळे समाजामध्ये ताण तणाव निर्माण होतात. असे विविध प्रसंग घडून समाजातील शांतता भंग होऊ नये म्हणून आपल्या पोलिस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जावी. स्वैराचाराचे समर्थन करून समाजव्यवस्था मोडकळीस आणणाऱ्या 'व्हॅलेंटाईन डे'ला भारतीय समाजातून हद्दपार केले गेले पाहिजे.१४ फेब्रुवारी दिवशी पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक निर्बंध आणून चुकीच्या प्रथेस आळा घातला जावा अशी मागणी बजरंग दलाने केली आहे. आजरा पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनावर राहुल नेवरेकर, श्रेयस सकट, प्रणव येजरे,अनुज डोणकर, अशोक बोलके, दिग्विजय सुतार व मंथन हळमरकर यांच्या सह्या आहेत.
============
Subscribe to:
Post Comments (Atom)
परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment