Wednesday, January 29, 2025

बांबू म्हणजे शेतकऱ्यांसाठी हिरवे सोने : सतीश कांबळे; संरबळवाडीत शेतकरी मेळावा

आजरा, वृत्तसेवा :
बांबू म्हणजे जाड काटेरी वेळू नसून, मेसकाटी सुध्दा बांबू मध्येच येते. या मेसकाटी चा उपयोग प्राचीन काळापासून सातत्याने सुरू असल्याचे, इतिहासात नोंद आहे. माणसाच्या जन्मा पासून ते अंत विधी पर्यंत मेसकाटीचा उपयोग केला जातो. पर्यावरणाचे संवर्धन  करणारा बांबू, आर्थिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी हिरवे सोने असल्याचे मत आजरा बांबू कलस्टरचे मुख्य प्रवर्तक सतीश कांबळे यांनी मांडले. सरबंळवाडी (ता. आजरा) येथील दुर्गामाता मंदिरात शेतकरी मेळावा आयोजित केला होता.  मेळावाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव तारळेकर होते. 

कांबळे पुढे म्हणाले, जगात बांबूच्या १६०० जाती आहेत. भारतात १४८ प्रकारचे बांबूच्या जाती असून, व्यावसायिक लागवडीसाठी १८ जातीना शासनाने प्रमाणीत केले आहे. शासनाने बांबू उत्पादनासाठी पिक कर्जाप्रमाणे बांबू साठी कर्ज व अनुदान मंजूर केले आहे. यावेळी भुमि शेतकरी गटाचे अध्यक्ष  वसंतराव तारळेकर यांनी बांबू हे पिक शेतकरी वर्गाने घेतल्यास इतर पिकाप्रमाणे अडचणीत येणार नाहीत. आर्थिक व पर्यावरण दृष्टीकोनातून बांबूला पर्याय नाही, यासाठी मी बांबू शेती कडे वळलो असल्याचे सांगितले. काॅ.संजय घाटगे यांनी इतर पिकांच्या वाढत्या खतांच्या  व मजूरीच्या दराने शेतकरी हतबल झाला आहे.  जंगली जनावराचा उपद्रवाने शेती उध्वस्त होत असून शेतकऱ्यांना बांबू हा पर्याय आसलेचे सांगितले. यावेळी माजी पोलिस पाटील गौरोजी कांबळे, भाऊ किल्लेदार, अब्दुल सोनेखान, प्रकाश  किल्लेदार, अमर पाटील, विश्वास बुगडे, सखाराम ईक्के, संजय चौगुले, शिवाजी भगुत्रे यांचे सह सरबंळवाडी, मलिग्रे  ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत मारूती कांबळे यांनी केले. आभार विश्वास किल्लेदार यांनी मानले.
=============

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...