Thursday, January 30, 2025

भादवण विकास सोसायटीच्या चेअरमनपदी संभाजी कांबळे, व्हा. चेअरमनपदी दत्तात्रय पाटील यांची बिनविरोध निवड

आजरा, वृत्तसेवा :
भादवण वि. का. स. (विकास)सोसायटी भादवण (ता. आजरा) संस्थेच्या चेअरमनपदी संभाजी विठ्ठल कांबळे यांची तर व्हा. चेअरमनपदी दत्तात्रय अंबाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी जे. एन. बंडगर होते.

चेअरमन मारुती देसाई व व्हा. चेअरमन दशरथ डोंगरे यांनी राजीनामा दिलेने रिक्त झालेल्या पदावर ही निवड करण्यात आली. संस्था स्थापनेपासून ते आजपर्यंत मागसवर्गीय समाजाला भादवण सारख्या मोठ्या गावात ३ कोटीची उलाढाल आसलेल्या एकमेव संस्थेचे अध्यक्ष पद दिले नव्हते, पण गेली १० वर्षे भादवणचा सर्वांगीण विकास करणेसाठी युवकांच्या बरोबरच जेष्टांचे मार्गदर्शन घेऊन गट नेते तथा शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील काम करत आहेत. त्यांनी सर्व समावेशक सगळ्या समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून आज चेअरमन पदासाठी कांबळे यांचे नांव घोषीत केले. चेअरमन पदासाठी कांबळे यांचे नाव संचालक पांडुरंग केसरकर यांनी सुचविले त्याला अशोक गुरव यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमनसाठी पाटील यांचे नांव मारुती देसाई यांनी सुचविले, त्याला दशरथ डोंगरे यांनी अनुमोदन दिले. यावेळी दोनच अर्ज आल्याने निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी नूतन पदाधिकारी यांचा सत्कार गटनेते उपसरपंच संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दत्तात्रय पाटील, एम. टी. मुळीक संचालिका रुक्मिणी पाटील, रत्नाबाई केसरकर यांच्यासह सभासद उपस्थित होते. आभार सचिव सुभाष पाटील यांनी मानले.
=================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...