Wednesday, January 29, 2025

आजरा अर्बन बँकेला "बँको ब्लू रिबन-२०२४” पुरस्कार

आजरा, वृत्तसेवा :
अविस पब्लिकेशन यांचेमार्फत लोणावळा येथे घेणेत आलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतातील अग्रगण्य को-ऑपरेटीव्ह बँकांचा सहभाग होता. आजरा अर्बन को-ऑप. बॅंक (मल्टीस्टेट) बँकेने गेली ६४ वर्षे अत्यंत उत्कृष्ठ बैंकिंग सेवा देत मार्च २०२४ अखेरच्या संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये अर्बन बँकामधून सर्व निकषामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केले बद्दल (ठेवी रु.८५० कोटी च्या वरील बँक) आजरा बँकेस अविस पब्लिकेशन यांचे मार्फत दिला जाणारा "बँको ब्लू रिबन-२०२४" चा पुरस्कार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे चिफ जनरल मॅनेजर भार्गेश्वर बॅनर्जी यांचे हस्ते व बैंकोचे पदाधिकारी अविनाश शिंत्रे आणि अशोक नाईक यांचे उपस्थितीत देणेत आला. यावेळी बँकोचे ज्युरी अतुल खिरवाडकर उपस्थित होते. सदर पुरस्कार बँकेच्या वतीने बँकेचे संचालक रमेश कुरुणकर, डॉ. दीपक सातोसकर, सुनील मगदुम, किशोर भुसारी, सुर्यकांत भोईटे यांनी स्विकारला. या बद्दल अविस पब्लिकेशन यांनी बँकेचे अभिनंदन केले.

आजरा अर्बन बँकेने बँकिंग हा केवळ व्यवसाय म्हणून न मानता समाजपयोगी आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेचे सर्व व्यवस्थापन आणि कर्मचारी कार्यरत आहेत यासाठी या बँकेचे कौतुक होत आहे. शेतीपुरक उद्योग, छोटे व्यावसायिक व उद्योग यांना अर्थ पुरवठा हा केंद्र बिंदू मानून बँकेने आतापर्यन्त जवळपास रु.१६०० कोटीच्या वर व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. स्वभांडवलावर मल्टी स्टेट दर्जा प्राप्त करणारी जिल्ह्यातील आजरा बँक ही एकमेव बँक असून शेड्यूल बँकेकडे वाटचाल सुरू आहे. बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बँकिंग, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsap Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत.
====================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...