Sunday, January 5, 2025

महायुतीने अशोक अण्णा चराटी यांचा सन्मान करण्याची गरज; विधान परिषदेवर किंवा महामंडळावर संधी देण्याची मागणी

महायुतीने अशोक अण्णा चराटी यांचा सन्मान करण्याची गरज; विधान परिषदेवर किंवा महामंडळावर संधी देण्याची मागणी 
आजरा, वृत्तसेवा :
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले. महायुतीने जिल्ह्यातील दहा पैकी दहा जागांवर विजय संपादन केला. यामध्ये चंदगड, राधानगरी व कागल या तीन विधानसभा मतदार संघामधून महायुतीचे आमदार विजयी करण्यामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या आजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांचा महायुतीने सन्मान करण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी काळात विधान परिषदेवर आमदार म्हणून किंवा महामंडळाचे अध्यक्ष पद देऊन चराटी यांचा सन्मान करण्याची मागणी होत आहे. 
आजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी हे संस्था समूहातील आजरा अर्बन बँक, आजरा सुतगिरण, जनता एज्युकेशन सोसायटी यासह विविध संस्थांच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात कार्यरत आहेत. तालुक्यामध्ये निर्णायक ठरणारा असा त्यांचा राजकीय गट आहे. गेली अनेक वर्ष ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आजरा तालुका चंदगड, राधानगरी व कागल या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागलेला आहे. या तीनही मतदार संघात निर्णायक राजकीय ताकद असणारा राजकीय गट म्हणून चराटी यांच्याकडे पाहिले जाते. विविध निवडणुकांच्या मध्ये त्यांच्या भूमिकेला मोठे महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे चराटी नेमकी काय भूमिका घेतात याकडे केवळ तालुक्याचे नाही तर जिल्ह्याचेही लक्ष लागून राहिलेले असते. एक धडाडीचे नेतृत्व म्हणून चराटी यांच्याकडे पाहिले जाते. आजरा तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच त्यांची धडपड असते. तसेच आपल्या संस्था समूहातील संस्थांचा नावलौकिक वाढतच राहील याकडे त्यांचा कटाक्ष असतो.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म म्हणून चराटी यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, राधानगरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर तर चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. या तीनही उमेदवारांच्या विजयासाठी चराटी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीनही मतदार संघ पिंजून काढले. या तीनही मतदार संघात चुरशीच्या व काटातोड लढती झाल्या होत्या. यावेळी आजरा येथे सर्वप्रथम मेळावे घेत, कार्यकर्त्यांशी चर्चा करून चराटी यांनी मुश्रीफ, आबिटकर व पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. हे तिघेही चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. यामुळे या तिघांच्या विजयात चराटी यांची भूमिका निर्णायक ठरली. 
विधानसभा निवडणुकीत निर्णायक क्षणी योग्य भूमिका घेऊन महायुतीच्या तीन आमदारांच्या विजयामध्ये योगदान देणाऱ्या अशोक चराटी यांचा महायुतीने सन्मान करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात महायुती सत्तेत आहे. चराटी यांनी पाठींबा देऊन विजयी झालेल्या तीन पैकी आबिटकर व मुश्रीफ हे दोघेजन कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळं चराटी यांना विधानपरिषदेवर आमदार किंवा महामंडळावर संधी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. चराटी यांनी यापूर्वी वस्त्रोद्योग महामंडळावर काम केले आहे. तसेच त्यांनी अण्णाभाऊ समूहातील संस्था बरोबरच जिल्हा बँक, बाजार समिती, आजरा साखर कारखाना या संस्थातही काम केले आहे. आजरा तालुक्याचे विधानसभा निवडणुकीसाठी तीन भाग झालं आहेत. यामुळे तुर्तासतरी तालुक्याला हक्काचा आमदार मिळणार नाही. त्यातच राजकीय इच्छाशक्तीच्या आभावामुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी चराटी यांना विधान परिषदेवर किंवा महामंडळावर संधी देण्याची मागणी तालुकावाशियातून होत आहे.
=================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...