Saturday, January 4, 2025

मंत्री आबिटकर, मुश्रीफ, आमदार महाडिक, पाटील यांचा रविवारी आजरावासियातर्फे नागरी सत्कार

आजरा, वृत्तसेवा :
महाराष्ट्र राज्याचे नूतन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, नूतन आमदार अमल महाडिक व आमदार शिवाजीराव पाटील यांचा आजरा तालुक्यातील तमाम जनता तसेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने रविवार दि. 5 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक तर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 
 दीड महिन्यापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. जिल्ह्यातील दहाही आमदार महायुतीचे विजयी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आजरा तालुका चंदगड, राधानगरी व कागल या तीन विधानसभा मतदारसंघात विभागला आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष शिवाजीराव पाटील, राधानगरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर, कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विजयी झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नामदार आबिटकर यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तर नामदार मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण ही खाती देण्यात आली. मंत्री अबिटकर, मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांच्या विजयात अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांच्या गटाने मोलाची भूमिका बजावली आहे. विधानसभा निकालानंतर मंत्री आबीटकर, मंत्री मुश्रीफ, आमदार महाडिक व आमदार पाटील हे प्रथमच आजरा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आजरा तालुका वासियांच्या वतीने त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन अशोक अण्णा चराटी यांच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता आजरा शहरातील आजरा अर्बन बँकेच्या समोरील मेन रोडवर होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट  व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्कार समिती आजरा तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
=========================

No comments:

Post a Comment

होनेवाडीत रस्ते कामाचा शुभारंभ; अशोकअण्णा चराटी, जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : होनेवाडी (ता. आजरा) येथे जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आजरा तालुक्य...