Thursday, January 30, 2025

आम्ही आमचे हक्क मिळवू; विधवा, परित्यक्ता, अपंग, निराधार स्त्री-पुरुषांचा आजऱ्यातील ठिय्या आंदोलनावेळी इशारा

आजरा, वृत्तसेवा :
सरकार कितीही निर्दयी आणि निष्ठुर वागले तरी महात्मा गांधींनी दिलेल्या सत्याग्रहाच्या अस्त्राचा वापर करून आम्ही आमचा हक्क मिळवू असा असा इशारा आज विधवा, परित्यक्ता, अपंग, निराधार स्त्री-पुरुषांच्या ठिय्या आंदोलनावेळी बोलताना कॉ संपत देसाई यांनी  दिला. गुरुवारी विधवा परित्यक्ता स्त्रियांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरवात झाली.

कॉ. संपत देसाई पुढे म्हणाले की, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे. समान संधी आणि हक्काचे सरंक्षण या कायद्याने राज्य आणि केंद्र सरकारकडून पेन्शन सुरू झाली. पेन्शन हा आमचा हक्क असून कुणी आमच्यावर दया करीत नाही. लाडक्या बहिणींना केवळ मतांसाठी न मागताही १५०० रुपये प्रमाणे एकदम चार महिन्याचे पैसे दिले. पण आमचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी आम्हाला लढावे लागते हे वाईट आहे. गांधींनी दिलेल्या सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने लढून आम्ही आमचे हक्क नक्कीच मिळवून घेऊ.
    
यावेळी कॉ शांताराम पाटील यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला. आंदोलनाचे नेतृत्व सरिता कांबळे, निवृत्ती फगरे, मुकुंद नार्वेकर, शंकर हाळवणकर, पार्वती जाधव, सुशीला होरंबळे यांनी केले. तहसील कार्यलयाच्या वतीने नायब तहसिलदार म्हाळसकांत देसाई लेखी पत्र देऊन आठ दिवसात सर्वांच्या खात्यात पेन्शन जमा होईल असे सांगितले. यावेळी शिवाजी चव्हाण, जनाबाई सुतार, सुनील सासुलकर, माया पाटील यांच्यासह विधवा परित्यक्ता, अपंग, स्त्री पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.

पुढील महिन्यात आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसो मुश्रीफ, खा. शाहू महाराज, आ. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत विधवा, परित्यक्ता, अपंग स्त्री-पुरुषांची परिषद घेण्याची ठराव एकमुखाने करण्यात  आला.
=====================

No comments:

Post a Comment

होनेवाडीत रस्ते कामाचा शुभारंभ; अशोकअण्णा चराटी, जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : होनेवाडी (ता. आजरा) येथे जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आजरा तालुक्य...