आजरा-गारगोटी देवकांडगाव, नवले मार्गे रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि काँक्रीटीकरण करण्याचे काम शेतकऱ्यांना कांहीही पूर्वसूचना न देता वेगाने सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मशनरी पण उतरली आहे. यासंदर्भात पेरणोली, साळगाव, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव या गावातील शेतकरी हनुमान मंदिर पेरणोली येथे जमले. कोणालाही कांहीही पूर्वकल्पना न देता मनमानी पध्दतीने कंपनीने काम सुरू केले असल्याने लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत जबाबदार अधिकारी येऊन तहसीलदार यांचे उपस्थितीत बैठक होऊन निर्णय होत नाही, तोपर्यंत काम बंद करण्याचा निर्णय करून सर्व शेतकऱ्यांनी जाग्यावर जाऊन रस्त्याचे काम बंद पाडले. कंपनीच्या मॅनेजरला सांगून मिटिंग होईपर्यंत काम बंद करण्यास सांगितले.
त्यानंतर जमलेल्या सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार आजरा याना भेटून त्यांनाही निवेदन दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भोसले यांनी लवकरत लवकर बैठक घेऊ व तोपर्यंत काम बंद राहील असे सांगितले. कॉ. संपत देसाई, पांडुरंग लोंढे, तानाजी देसाई, सुभाष देसाई, उल्हास त्रिरत्ने, मारुती पाटील, सुरेश पाटील, बंटी दत्तात्रय देसाई, उत्तम नातलेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
No comments:
Post a Comment