Thursday, January 9, 2025

आजरा तालुक्याकडे विशेष लक्ष देवून विकास साधणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ; वेळवट्टी येथे जाहीर नागरी सत्कार

आजरा, वृत्तसेवा :
आजरा तालुका तीन विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे. तीनही आमदार महायुतीचे असले तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आजरा तालुक्याकडे विशेष लक्ष देऊन तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणावर कसा होईल याकडे कटाक्ष राहणार आहे. तसेच माझे नेतृत्व म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले. ते वेळवट्टी (ता. आजरा) येथे वेळवट्टी ग्रामस्थ व आजरा तालुका वासियांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा बँक संचालक प्रताप उर्फ भैया माने यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
कागल विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल व 9 व्यंदा मंत्रीपदी शपथ घेतल्याबद्दल वेळवट्टी ग्रामस्थ व आजरा तालुक्यातील जनता तसेच विविध संस्थांच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक करताना जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई म्हणाले, ना. मुश्रीफ यांचे सर्वसामान्य माणसासाठी असणारे काम वाखाण्याजोगे आहे. आजरा तालुक्यातील आजरा व कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघासाठी ना. मुश्रीफ यांनी अडीच कोटींचा विकास निधी दिला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्यात अग्रेसर बनवण्याचे काम केले आहे. अडचणीतील साखर कारखाने चांगले चालावे यासाठी ना. मुश्रीफ यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. शासनाने संमती पीक कर्ज बंद केले आहे. यामुळे अनेक जणांची अडचण होणार आहे, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा गरजेचा आहे. विकास सेवा संस्थांची सचिव भरती थांबली आहे, सचिव भरतीच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. 
ना. मुश्रीफ पुढे म्हणाले, झालेली विधानसभा निवडणूकिसाठी विरोधात अनेक चक्रव्ह्यूव्ह रचले गेले, मात्र सर्वसामान्य जनता, माता भगिनी पाठीशी असल्यामुळे   विजय सुकर झाला. सर्वांनी जो प्रचंड विश्वास दाखवला आहे, या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करणार आहे. वैद्यकीय शिक्षण खात्यामध्ये गेल्या 14-15 महिन्यात चांगले काम केले आहे. या खात्याचे काम देशात सर्वोच्च करण्याचा मानस आहे. कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल दुरुस्तीचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. शेंडा पार्क येथील अकराशे बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल देखील आगामी वर्षभरात पूर्णत्वास जाईल. आगामी काळात राज्यात चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे रखडलेले प्रोत्साहन अनुदान त्रुटी दूर करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गट सचिवांच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्यात येईल. एनसीडीसी मार्फत आजरा साखर कारखान्याला लवकरात लवकर कर्जपुरवठा करण्यात येईल. तसेच आगामी काळात जिल्हा बँक आजरा साखर कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. मे महिन्याच्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मानस असून या निवडणुकांच्या अगोदर लाडक्या बहिणीचे 1500 वरून 2100 रुपये केले जातील. 2029 मध्ये लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. मतदार संघाच्या संकेत किमान 30 टक्के वाढ अपेक्षित असून महिला आरक्षण देखील लागू होण्याची शक्यता आहे. 2029 ची विधानसभा निवडणूक लढवून पुन्हा मंत्री होणार. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवून केंद्रात मंत्री होण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, सर्वसामान्य माणसाचे समाधान करणारे नेतृत्व म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहावे लागेल. आगामी काळात हसन मुश्रीफ यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंत धुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा बँक संचालक प्रताप उर्फ भैया माने, रणजीतसिंह पाटील, संतोष पाटील, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष एम. के. देसाई, संचालक विष्णुपंत केसरकर, शिवाजी नांदवडेकर, रचना होलम, मनीषा देसाई, नामदेव नार्वेकर, दीपक देसाई, रणजीत देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, जनता बँक संचालक विक्रमसिंह देसाई, आजरा तालुका संघ अध्यक्ष विठ्ठल देसाई, माजी उपसभापती शिरीष देसाई, राजू होलम, रवींद्र भाटले, संजय सावंत, जनार्दन बामणे, विजय देसाई, सरपंच मारुती पोवार, उपसरपंच शोभा माने, तहसीलदार समीर माने साहेब गटविकास अधिकारी दिनेश शेटे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. एकनाथ गिलबिले यांनी सूत्रसंचालन केले. 
========================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...