Thursday, January 30, 2025

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची 31 डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा

आजरा, वृत्तसेवा :
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालू हंगामात आजअखेर 74 दिवसात 2 लाख 30 हजार मे. टन ऊसाचे गाळप झाले असुन कारखान्याकडे दि. 16 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्रतिटन 3 हजार 100 रुपये प्रमाणे 15 कोटी 36 लाख रुपये विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली आहेत. तरी संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी यांनी आपल्या बँकेशी सपर्क साधून बिलाची रक्कम उचल करावी अशी माहिती कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली.

हंगाम 2024-25 मध्ये करखाना व्यवस्थापनाने ठेवलेल्या उददीष्टा प्रमाणे गाळपाचे नियोजन केले असुन सद्या येत असलेल्या ऊसाचे गाळप करून हंगाम यशस्वी करणेचा प्रयत्न करीत आहोत. कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या बीड व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणा कार्यक्षेत्रात लावुन प्राधान्याने ऊसाची उचल करणेचे नियोजन सुरू आहे कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष ना. हसन मुश्रीफ (वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले नियमितपणे आदा करणेचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. तरी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आजरा कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी संचालक मंडळाच्या वतीने केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र.कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.
==========================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...