Tuesday, January 28, 2025

आजरा शहरात सुतार-लोहार समाजाचे संघटन; नवी कार्यकारिणी जाहीर

आजरा, वृत्तसेवा :
आजरा शहरातील सुतार-लोहार समाजाने एकत्र येत आपली संघटना बांधण्याचा निश्चय केला आहे. या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी सामुदायिक प्रयत्न करण्यात येणार आहेत. समाजाच्या हितासाठी निर्माण करण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अभिजित बाबुराव सुतार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
आजरा येथे सुतार-लोहार समाजाची वस्ती असणारी गल्ली, सुतार गल्ली म्हणून सुपरिचित आहे. या गल्लीमध्ये सुतार-लोहार समाजाची साधारणपणे 50 हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. तसेच शहराच्या इतर भागातील या समाजातील कुटुंबे वास्तव्यास आहेस. गेली अनेक वर्ष हा समाज सुतार काम करून आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र या समाजात संघटित नव्हता. हे जाणून या समाजातील युवक प्रवीण सुधीर सुतार, सतीश लक्ष्मण सुतार, विनायक राजाराम सुतार, ओंकार अभिजीत सुतार, महादेव गोपाळ सुतार या व इतर युवकांनी आपल्या असंघटित समाजाला संघटित करण्याचा निश्चय केला. दोन महिन्यापूर्वी समाजातील युवक व जेष्ठ यांना एकत्र करत त्यांनी बैठकीचे आयोजन केले. पुढाकार घेतलेल्या युवकांचा समाजाला एकत्र करण्याचा हेतू शहरातील सुतार-लोहार समाजातील सर्वांनाच मनापासून पटला. सर्वच समाज बांधवांनी या युवकांना साथ देण्याचे ठरविले. यातून नव्या संघटनेची निर्मिती होऊन कार्यकारणी तयार करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून शहरातील सुतार-लोहार समाजाला नवी दिशा देण्याबरोबरच समाजाची उन्नती करण्याचा निर्धार ज्येष्ठ व युवा वर्गाने केला आहे. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत समाजातील गौतम सुतार यांची रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी शाखा आजरा येथे सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी शशिकांत सुतार यांनी मार्गदर्शन केले.
आजरा शहरातील सुतार लोहार समाजाची निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष - अभिजीत बाबुराव सुतार, उपाध्यक्ष - बाबासाहेब गोविंद सुतार, सचिव - संजय सदाशिव सुतार, खजिनदार - संतोष लक्ष्मण सुतार, संदीप दत्तात्रय सुतार, कार्यकारणी संचालक - प्रवीण सुधीर सुतार, संपत संभाजी सुतार, विशाल तानाजी सुतार, उदय आनंदा लोहार, शंकर रामा लोहार, रमेश आनंदा सुतार, महादेव कृष्णा सुतार, प्रभाकर शंकर सुतार, मोहन श्रीपती सुतार, प्रवीण दिलीप सुतार. यावेळी ओंकार अभिजीत सुतार, प्रदीप दत्तात्रय सुतार, संभाजी लक्ष्मण सुतार, महादेव गोपाळ सुतार, बाबासाहेब जगन्नाथ सुतार, सुधीर बंडू सुतार, प्रभाकर शंकर सुतार, दिग्विजय संजय सुतार, महेश ज्ञानेश्वर सुतार, केरबा दत्तू सुतार, दिलीप आनंदा सुतार,  चंद्रकांत नानू लोहार, सुरज सुधाकर सुतार, महादेव लक्ष्मण लोहार, रवींद्र केशव सुतार, बबन नारायण सुतार, राजाराम रामजी सुतार, रामा यशवंत सुतार, प्रवीण शामराव सुतार, रवींद्र सदाशिव सुतार, गुरुनाथ जानबा सुतार, श्रीकांत मारुती सुतार, पाडुरंग सुतार, मोहन श्रीपनी सुतार, हणमंत वसंत सुतार, अनिल पांडुरंग सुतार, मनोहर संतू सुतार, प्रविण सुतार, गौतम पांडूरंग सुतार, सतोष शामराव सुतार, संकल्प मधुकर सुतार, शंकर रामा लोहार, शशिकांत गोपाळ सुतार, महादेव कृष्णा सुतार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
========================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...