Monday, January 27, 2025

पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची खोटी माहिती देऊन आजऱ्यातील निवृत्त प्राध्यापिकेला 30 लाखाचा गंडा

आजरा, वृत्तसेवा :
आजरा येथील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला पोलिसात आपल्यावर गुन्हा नोंद झाला आहे, असे फोन द्वारे खोटे सांगून तीस लाख रुपयेला गंडा घालण्यात आलेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, आजरा येथील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला 28 डिसेंबर 2024 ते 17 जानेवारी 2025 या कालावधीत फोनवरून अज्ञात व्यक्तीने आपल्यावर अंधेरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे, तसेच इतर खोटी माहिती दिली. यामुळे सेवानिवृत्त प्राध्यापिकेने विविध डिजिटल माध्यमातून अज्ञात व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर 29 लाख 93 हजार 150 रुपये पाठविले. मात्र त्यानंतर संबंधित सेवानिवृत्त प्राध्यापिकेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आजरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी इंगवले यांचे आदेशान्वये भुदरगड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक लोढे यांना दिला आहे. सेवानिवृत्त प्राध्यापिकेची सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम मोबाईलचा वापर करून हडपण्यात आली, या प्रकारामुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
==================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...