Sunday, January 26, 2025

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण संपन्न

कोल्हापूर, वृत्तसेवा : 
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चेअरमन डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक व संघाचे अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
संघाचे ताराबाई पार्क येथील आवारात संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते ध्‍वजारोहण करणेत आले. तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणा-या संघाच्‍या दूध शितकरण केंद्रावरही राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करणेत आले. गोगवे चिलिंग सेंटर संचालक अमरसिंह पाटील, गडहिंग्‍लज चिलिंग सेंटर संचालक नविद मुश्रीफ, बिद्री चिलिंग सेंटर संचालक किसन चौगले, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक मुरलीधर जाधव, तावरेवाडी चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक नंदकुमार ढेंगे व मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना ये‍थे संचालक प्रकाश पाटील यांच्‍या हस्‍ते करणेत आले.
यावेळी संघाचे संचालक डॉ.चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
==========================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...