गेली तीन-चार महिने अपंग, विधवा, परित्यक्ता, निराधार स्त्री-पुरुषांना मिळणारी पेन्शन न मिळाल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आजरा तालुक्यातील संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांनी एकत्र येत श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जाऊन आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हंटल आहे की, लाडक्या बहिणीसारख्या लोकप्रिय घोषणा करून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या सरकारला अपंग, विधवा, परित्यक्ता, निराधार स्त्री-पुरुषांचा आज विसर पडला आहे. खरंतर या सामाजिक दृष्ट्या मागास विभागांना सन्मानाने जगता यावे यासाठी या योजना केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तरित्या सुरू केल्या पण अलीकडे या समाज विभागांचा सरकारला विसर पडला आहे की काय अशी शंका आम्हाला आता येऊ लागली आहे. त्यामुळे येत्या बुधवार पर्यंत पेन्शनची रक्कम खात्यावर जमा न झाल्यास आम्हाला नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही निवेदनातून दिला आहे. यावेळी कॉ. संपत देसाई, निवृत्ती फगरे, सुशीला होरंबळे, शिवाजी चव्हाण, सरिता कांबळे, सुनीता सुतार, सुरेश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
=====================
No comments:
Post a Comment