Wednesday, January 15, 2025

हाळोली-मेढेवाडी-दर्डेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नानासो पाटील

आजरा, वृत्तसेवा :
 हाळोली-मेढेवाडी- दर्डेवाडी (ता. आजरा) ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नानासो दिनकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा केसरकर होत्या. उपसरपंच पदासाठी नानासो पाटील यांचे नाव लहू पाटील यांनी सुचविले. उपसरपंच पदासाठी नानासो पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कांबळे, दशरथ सुतार, स्वाती गुरव, विद्या पाटकर, जयश्री पाटील, स्वप्नाली कांबळे उपस्थित होते. उपसरपंच निवडीनंतर नानासो पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष केला.   
===============

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...