स्वतःची स्वप्नं पूर्ण करताना माणसाची अक्षरशः दमछाक होते. जीव मेटाकुटीला येतो. आयुष्यामध्ये स्वतःच्या घराचं स्वप्नं प्रत्येकजण पाहत असतो. स्वतःचं घर व्हावं यासाठी माणूस रात्रंदिवस झटत असतो. अशा परिस्थितीत एक खंबीर आधार देण्याचं काम आजरा येथील जनता सहकारी गृहतारण संस्था नेहमीच करत आली आहे. दुस-याचं घर व्हावं अशी मनीषा बाळगून ते प्रत्यक्षात उतरविण्याचं पुण्याचं कार्य संस्था करीत आहे, असे गौरवोद्वार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाशराव आबिटकर यांनी काढले. आजरा येथील जनता गृहतारण संस्थेच्या स्थलांतरीत नवीन कार्यालयाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंदगड विधानसभेचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील व प्रमुख उपस्थितांमध्ये अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी व सहायक निबंधक एस. बी. येजरे उपस्थित होते. संस्थाध्यक्ष मारूती मोरे अध्यक्षस्थानी होते.
आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले की सप्टेंबर, 2001 मध्ये स्थापन झालेल्या संस्थेची रौप्यमहात्सवाकडे वाटचाल सुरु असताना संस्थेला राज्य कार्यक्षेत्र व आयएसओ मानांकन मिळणे हे संस्थेच्या प्रगतीचे द्योतक आहे. अशोकअण्णा चराटी म्हणाले, सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार, काटकसरीचे धोरण, घरपोच, तत्पर व विनम्र सेवा यामुळे 'माणसं जोडणारी संस्था' म्हणून अल्पावधितच नावारूपाला आली आहे.
स्वागत व प्रास्ताविक प्रो. अशोक बाचुळकर यांनी केले. आभार व्हाईस चेअरमन गणपतराव अरळगुंडकर यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. आनंद चव्हाण यांनी केले. कार्यक्रमासाठी संचालक प्राचार्य अशोक सादळे, प्रो. तानाजी कावळे, शिवाजी पाटील, प्रो. संजय गायकवाड, प्रो. तानाजी पाटील, प्राचार्य बाळकृष्ण चौगले, डॉ. टी. एन. पवार, डॉ. अशोक दोरूगडे, डॉ. संजय पाटील, सौ. एल. डी. शेटे, सौ. नेहा पेडणेकर, महादेव मोरूस्कर, बी. एस. कडवाले, प्रा. मनोज देसाई, सुभाष डोंगरे, मैनेजर मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी, दत्तात्रय मोहिते, शिवाजी बिद्रे, डॉ. रवींद्र गुरव, सिद्धेश नाईक, सागर कुंभार आदि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment