आजरा येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी कै. रमेश टोपले यांच्या स्मृती प्रित्यर्थ नवनाट्य कला मंच संस्था आजरा यांच्या वतीने रविवार दि. 12 जानेवारी पासून कै. रमेश टोपले राज्यस्तरीय नाट्य महोत्सवास सुरुवात होत आहे. या नाट्य महोत्सवात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांची आठ दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होणार आहे. रविवार दि. 19 जानेवारी पर्यंत हा नाट्यमहोत्सव चालणार आहे. नवनाट्य कला मंच संस्था आजरा यांच्यावतीने गेली अकरा वर्ष आजरा येथे राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये आत्तापर्यंत राज्यभरातील अनेक दर्जेदार व चांगली नाटके सादर झालेली आहेत. आजरा तालुका व आजरा नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नाट्यकला जोपासली जात आहे.
यावर्षी नाट्यमहोत्सवामध्ये रविवार दि. 12 जानेवारी रोजी अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली निर्मित "देहभान" हे नाटक सादर होणार आहे. सोमवार दि. 13 जानेवारी रोजी मनोरंजन मंडळ इचलकरंजी निर्मित "तिचे संदर्भ नसलेली गोष्ट" हे नाटक सादर होणार आहे. मंगळवार दि. 14 जानेवारी रोजी जागृती कला मंच कुसवडे सातारा निर्मित "गुपित तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचं" हे नाटक सादर होणार आहे. बुधवार दि. 15 जानेवारी रोजी दुर्वांकुर कला केंद्र हरमल निर्मित "येथे ओशाळला मृत्यू" हे नाटक सादर होणार आहे. गुरुवार दि. 16 जानेवारी रोजी लोक रंगभूमी सांगली निर्मित "सितारों से आगे" हे नाटक सादर होणार आहे. शुक्रवार दि. 17 जानेवारी रोजी वैभवी क्रिएशन डिचोली निर्मित "अबोल प्रीतीची अजब कहानी" हे नाटक सादर होणार आहे. शनिवार दि. 18 जानेवारी रोजी ताडोबा क्रिएशन मोरजी निर्मित "संगीत कधीतरी कोठेतरी" हे नाटक सादर होणार आहे. रविवार दि. 19 जानेवारी रोजी नित्य श्रद्धा फाउंडेशन आजरा निर्मित "वॉक इन" हे नाटक सादर होणार आहे. आजरा महाविद्यालयाच्या रंगमंचावर दररोज सायंकाळी सात वाजता ही नाटके सादर होणार आहेत.
No comments:
Post a Comment