राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने घोटवडे (ता. राधानगरी) येथे शनिवार, दि. 11 जानेवारी रोजी मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.00 वाजता शिबिराचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. या शिबिरामध्ये कोल्हापुरातील नामांकित रुग्णालये सहभागी होणार आहेत.
डोंगळे म्हणाले, अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात आहेत. सर्वसामान्यांना सरकारच्या आरोग्य सेवांचा मोफत लाभ मिळावा यासाठी ॲपल सरस्वती हॉस्पिटल, ॲस्टर आधार हॉस्पिटल, साई कार्डियाक सेंटर, मगदूम हॉस्पिटल, जानकी हॉस्पिटल, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ आर्थोपेडीक, नंदादीप आय हॉस्पिटल, गंगाप्रकाश हॉस्पिटल आदिसह शासकीय योजनेअंतर्गत येणारे जिल्ह्यातील बहुसंख्य रुग्णालयाच्या वतीने तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया व औषधोपचार करणार आहेत.
शनिवारी या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, जनता एज्युकेशन सोसायटी आजराचे अध्यक्ष अशोक चराटी, भोगावती साखर कारखान्याचे संचालक सरपंच धीरज डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. विद्या मंदिर घोटवडे येथे होणाऱ्या या मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने करण्यात आले आहे.
======================
No comments:
Post a Comment