Tuesday, December 17, 2024

आजऱ्यात हिंदी नवलेखकांसाठी पाच दिवसीय निवासी शिबिर;आजरा महाविद्यालय व केंद्रीय हिंदी निदेशालयाच्यावतीने आयोजन

आजऱ्यात हिंदी नवलेखकांसाठी पाच दिवसीय निवासी शिबिर;आजरा महाविद्यालय व केंद्रीय हिंदी निदेशालयाच्यावतीने आयोजन 
आजरा, वृत्तसेवा : 

आजरा महाविद्यालयात १७ ते २१ डिसेंबर दरम्यान हिंदीतरभाषी हिंदी नवलेखकांसाठी शिबिर होत आहे. केंद्रीय हिंदी निदेशालय शिक्षा मंत्रालय ( उच्च तर शिक्षा विभाग )  भारत सरकार, नवी दिल्ली व आजरा महाविद्यालय आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होत आहे. पाच दिवसीय निवासी शिबिरात महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, गोवा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या ठिकाणाहून नवलेखक आणि मार्गदर्शक सहभागी होत आहे. 
        
शिबिराचे उद्घाटन १७  डिसेंबर रोजी सकाळी १०  वाजता शिवाजी विद्यापीठाचे प्र - कुलगुरु प्रो. डॉ. पी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत व जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी बिहार येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्याम नंदन, पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेंद्र ठाकूरदास, केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्ली येथील उपसंचालक रत्नेश मिश्रा उपस्थित राहणार आहेत. शिबिरात कविता, गीत, गझल, महाकाव्य, कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक, निबंध, आत्मकथा, प्रवास वर्णन, समीक्षा आणि पत्रकारिता लेखन व अनुवाद इत्यादी विषयांवर मार्गदर्शन व चर्चासत्र होणार आहेत
       
 शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वा. शिवाजी विद्यापीठ हिंदी विभागाच्या प्रभारी अध्यक्ष प्रो. डॉ. तृप्ती करेकट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नवलेखकांसाठीच्या शिबिरासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. ए. एन. सादळे, हिंदी विभाग प्रमुख व शिबिर संयोजक प्रो. डॉ. अशोक बाचुळकर यांनी केले आहे.
==============

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...