अखेर महामार्गावरील 'त्या ' खड्ड्याने बळी घेतला
आजरा, प्रतिनिधी :
आजरा शहरापासून जवळ असणाऱ्या वनखात्याच्या हद्दीत असलेल्या महामार्गावरील 'त्या ' खड्ड्याने एका महिलेचा बळी घेतला.महामार्ग व्यवस्थापणेच्या केवळ दुर्लक्षामुळे नाहक महिलेचा बळी गेला आहे.
आजरा शहरातून संकेश्वर बांदा महामार्ग गेला आहे. गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाले असून वाहतूकही सुरु आहे.वाहनांचा वेगही वाढला आहे.वनखात्याच्या हद्दीत केवळ डांबरीकरण झाले आहे.
आजरा जवळील मसोबा देवाजवळील रस्ता हा देखील वनखात्याच्या हद्दीत आहे.येथेही डांबरीकरण झाले आहे.याच रस्त्यावर खड्डा पडला आहे.नवीन रस्ता झाला असताना कांही महिन्यातच खड्डे पडल्यामुळे दर्जेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. कांही महिन्यांपासून मसोबा देवाजवळ खड्डा पडला आहे. महामार्गाच्या लक्षात हा खड्डा आला असतानाही त्याची दुरुस्ती वेळेत झालेली नाही.वेगाने येणाऱ्या वाहनधारकांना हा खड्डा लक्षात येत नाही.यामुळे यापूर्वीही किरकोळ अपघात येथे झाले आहेत.
बुधवारी आजऱ्यातील विक्रम कुडाळकर व पत्नी सुरेखा गडहिंग्लजहून देवदर्शनाला गेले होते.परतत असताना या खड्ड्यावर मोटारसायकल आदळली यामुळे सुरेखा उडून पडल्या.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा काल मृत्यू झाला.
महामार्ग झाला असलातरी या रस्त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे मात्र ठेकेदारा कडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.अनेक ठिकाणी नवीन रस्त्यावर खड्डे पडले आहेत.यामुळे आता कामाच्या दर्जावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
या रस्त्याचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त चाचणीअभावी रस्ता हस्तांतरणाचे काम रखडले आहे. हस्तांतरण न झाल्याने या रस्त्यावर एखादी दुर्घटना झाल्यास रस्त्याच्या मालकीबाबत जबाबदार कोण, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे.
======================
No comments:
Post a Comment