Sunday, October 27, 2024

राधानगरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा स्वाभिमानाचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी साथ द्या : के. पी. पाटील; आजरा येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा

राधानगरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा स्वाभिमानाचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी साथ द्या : के. पी. पाटील; आजरा येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा 
 आजरा, वृत्तसेवा :

 राधानगरी-भुदरगड-आजराचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. या गद्दारीचा शिक्का केवळ आबिटकरांना लागला नाही तर राधानगरी-भुदरगड-आजराच्या तमाम जनतेला लागला आहे. हा गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी विद्यमान आमदारांना पराभूत करून पुन्हा स्वाभिमानाचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी साथ द्या असे आवाहन, राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. ते आजरा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी या निष्ठावंत शिवसैनिक मेळाव्याचे आयोजन केले होते.

 स्वागत व प्रास्ताविक करताना संजय येसादे म्हणाले, राधानगरीचा आमदार निष्ठावंत शिवसैनिकच ठरवणार आहेत. लोकसभेला एक सरला, विधानसभेला एक उरलाय, त्याला घरी बसवण्यासाठी साऱ्यांनी सज्ज व्हायचे आहे. विद्यमान आमदार फक्त बोर्ड लावून नारळ वाढवण्याचे काम करत आहेत. माजी आमदार के. पी. पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रात गद्दारीचा पायंडा पडला आहे. यामुळे पुरोगामी विचाराला अडथळे होत आहेत. त्यासाठी गद्दारांना गाडण्याची ही लढाई आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार दृढ करण्याची ही लढाई आहे. 2014 साली 20 गुंठे जमीन असणाऱ्यांच्या कडे शेकडो एकर जमीन कुठून आली, असा सवाल करत ते म्हणाले, विद्यमान आमदारांनी केवळ पैसा मिळवण्याचे काम केले आहे. पाटगाव  धरण आदानीला विकण्याचे षडयंत्र काही मंडळींनी रचले होते, मात्र तो डाव मतदार संघातील सुज्ञ जनतेने हाणून पाडला. चांगला चालविलेल्या बिद्री साखर कारखान्यात राजकीय आकसापोटी  विरोध करून सभासदांचे नुकसान केले आहे. शिवसेना ठाकरे गटाची पेटती मशाल हा धगधगता अंगार आहे. लाडकी बहीण ही सरकारी योजना आहे, ती कुणाची मेहेरबानी नाही. ठाकरे यांचा शिवसैनिक खूपच चिकाटीचा आहे, त्यामुळे स्वाभिमानी शिवसैनिक लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. आगामी काळात प्रत्येक कार्यकर्त्याची जपणूक करून सन्मान केला जाईल. शिवसैनिकाला ताकद देण्याचे काम केले जाईल. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले, सहकारातील आदर्शवत बिद्री कारखानाच्या इथेनॉल प्रकल्पाला विरोध करून विद्यमान आमदारांनी चांगल्या चाललेल्या संस्था बंद पाडण्याचे काम सुरू केले आहे. यातून सामान्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. गद्दारांच्या विरोधातील लढाईत माजी आमदार के. पी. पाटील यांना मोठ्या फरकाने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. विश्वनाथ कुंभार म्हणाले, विद्यमान आमदारांनी नेमका काय विकास केला हेच कळत नाही. शक्तिपीठ महामार्ग नेमका कुणाला हवा होता, मतदार संघातील एमआयडीसीचे गेल्या दहा वर्षात नेमकं काय झालं? असे सवाल करीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नुसत्या घोषणांचा पाऊस सुरू असल्याची त्यांनी सांगितले. तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले, मशाल चिन्ह के. पी. पाटील यांनी घेतल्यामुळे शिवसैनिकांना हत्तीचे बळ मिळाले आहे. गद्दार आमदारांना धडा शिकवल्याशिवाय निष्ठावंत शिवसैनिक शांत बसणार नाहीत. गेल्या दहा वर्षात विरोधकांना त्रास देण्याचे काम आबिटकर बंधूंनी केल्यामुळे त्यांचा पराभव यावेळी निश्चित आहे. महामार्गाचा आजरा शहरानजी होणारा टोल नेमका कुणाला पाहिजे, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. यावेळी माजी सभापती उदयराज पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले, दयानंद भोपळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँक संचालक रणजीत पाटील, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, आजरा शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, आजरा तालुका संघ संचालक महेश पाटील, जनता बँक संचालक विक्रम देसाई, शिवाजी आढाव, प्रसाद पिलारे, गीता देसाई, राजकुमार भोगण, संकेत सावंत, संतोष पाटील यांच्यासह आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते. 
=========================
जाहिरात....
शिवन्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आजरा 
 घरापासून घरापर्यंतचा सुखकर प्रवास.... 
आमच्याकडे 7 सीटर, 4 सीटर आरामदायी एसी/ नॉन एसी कार भाड्याने मिळतील.
बदली ड्रायव्हर मिळतील.
 संपर्क : 9765903651 /  7558675252 (प्रवीण सुतार)
======================
जाहिरात....
दिवाळीच्या रेडिमेड फराळासाठी आजरेकरांची पहिली पसंदी....
शंकर बेकर्स अँड स्वीट,
छ. संभाजी चौक, आजरा.
संपर्क : 9850372737
=====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================

No comments:

Post a Comment

होनेवाडीत रस्ते कामाचा शुभारंभ; अशोकअण्णा चराटी, जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : होनेवाडी (ता. आजरा) येथे जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आजरा तालुक्य...