गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा
कोल्हापूर, वृत्तसेवा :
राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे योग्य नेतृत्व आहे. आमदार म्हणून गेल्या दहा वर्षात त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांना चालना दिली. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे गट व त्यांचे सर्व कार्यकर्ते आमदार आबिटकर यांच्या पाठीशी आहेत. त्यांना पाठिंबा दिला असून सोमवारी 28 ऑक्टोंबर रोजी आमदार आबिटकर हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यामध्ये डोंगळे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले. गोकुळ अध्यक्ष डोंगळे यांनी रविवारी , 27 ऑक्टोंबर रोजी सकाळी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीत आमदार आबिटकर यांना पाठिंबाची घोषणा केली.
गोकुळ अध्यक्ष डोंगळे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्या कार्यकर्त्यांशी, डोंगळे गटाला मानणाऱ्या सगळ्या मंडळींशी चर्चा केली. मतदार संघाच्या हितासाठी कोणाला पाठिंबा द्यायचा याविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांनी व गटाने निर्णय घेण्याचे अधिकार मला दिले. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत आबिटकर यांना पाठिंबा द्यायचे ठरले, असे डोंगळे म्हणाले. राधानगरी विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत. महायुतीकडून प्रकाश आबिटकर, महाविकास आघाडीकडून के. पी. पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए. वाय. पाटील हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तिघांशीही माझे जवळचे संबंध आहेत. के. पी. पाटील यांचे बिद्री कारखान्यात उत्कृष्ट कामकाज आहे. त्यांनीही 2004 ते 2014 या कालावधीत दोन वेळेला आमदार म्हणून मतदारसंघाचे नेतृत्व केले. 2014 पासून आबिटकर हे विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. आमदार म्हणून दोघांच्या कामाची तुलना केल्यास विद्यमान आमदार आबिटकर हे अधिक योग्य वाटतात. के. पी. पाटील हे आमदार व बिद्री कारखान्याचे अध्यक्ष अशा दुहेरी भूमिकेत होते. कारखान्यात के. पी. यांचे कामकाज सभासद हिताचे आहे. मात्र आमदार म्हणून केपी हे मतदारसंघाला पाहिजे तसा न्याय देऊ शकले नाहीत अशी एक भावना आहे. याउलट मतदार संघातील सगळ्या घटकांच्या गरजा लक्षात घेऊन विद्यमान आमदार आबिटकर हे काम करत आहेत त्यामुळे या निवडणुकीत आपण त्यांच्यासोबत आहोत असे डोंगळे म्हणाले. आबिटकर यांच्या प्रचारात डोंगळे गटाला मानणारे सगळे कार्यकर्ते, मतदार सक्रिय असतील. त्यांना निवडून आणण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा असेल असेही गोकुळचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.
=======================
जाहिरात....
शिवन्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आजरा
घरापासून घरापर्यंतचा सुखकर प्रवास....
आमच्याकडे 7 सीटर, 4 सीटर आरामदायी एसी/ नॉन एसी कार भाड्याने मिळतील.
बदली ड्रायव्हर मिळतील.
संपर्क : 9765903651 / 7558675252 (प्रवीण सुतार)
======================
जाहिरात....
दिवाळीच्या रेडिमेड फराळासाठी आजरेकरांची पहिली पसंदी....
शंकर बेकर्स अँड स्वीट,
छ. संभाजी चौक, आजरा.
संपर्क : 9850372737
=====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================
No comments:
Post a Comment