मडिलगे रेशन धान्य दुकानदाराकडून इ केवायसीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट; आजरा तहसीलदारांना निवेदन
आजरा वृत्तसेवा :
मडिलगे (ता. आजरा) येथील रेशन धान्य दुकानदाराकडून इ केवायसीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट सुरु आहे. शासन स्तरावरून इ केवायसी साठी पैसे आकारणी करण्याबाबत कोणताही निर्णय नसताना रेशन धान्य दुकानदारांकडून पैसे आकारले जात आहेत, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतं आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदारांना मडिलगे ग्रामस्थ व मडिलगे रास्त धान्य दुकान दक्षता कमिटीच्या सदस्यांनी दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, मडिलगे येथे भावेश्वरी विकास सेवा रेशन दुकानामार्फत रेशन वाटपाचे काम होतं. शासनाकडून रेशनकार्ड धारकांची इ केवायसी करणे हे काम चालू आहे. हे काम प्रत्येक गावातील रेशन धान्य दुकानामार्फत केले जात आहे. यासाठी कोणतेही पैसे घेऊ नये, असा शासन निर्णय आहे. मात्र सदर कामासाठी मडिलगे येथील रेशन धान्य दुकानदारामार्फत माणसी वीस रुपये या प्रमाणे आकारणी संबधित दुकानदार नागरिकांकडून घेतले जात आहे. असा कोणताही पैसे घेण्याबाबतचा शासन निर्णय नसतानाही गोरगरीब जनतेकडून लुट होत आहे. तसेच वारंवार दक्षता कमिटीने मासिक सभा लावण्याची सूचना देवून सुद्धा दक्षता कमिटीची सभा घेतली जात नाही व रेशन वाटप करण्याचा वेळ स्वतः च्या मनमानीने चालू आहे. ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये त्या दुकानदाराला इ केवायसीच्या पैशाच्या विषयी विचारले असता उद्धट उत्तरे देण्यात आली. तरी सदर कामाची इ केवायसी मोफत करून मिळावी व ज्या रेशन धारकांकडून पैसे घेतले आहेत त्यांना पैसे परत मिळावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर अभिजीत मोहिते, आनंदा घंटे बबन कातकर, विश्वजीत मुंज, सचिन कातकर, नितीन कातकर यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
============================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================
No comments:
Post a Comment