Monday, October 21, 2024

विशाल निट्टूरकर यांची जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड

विशाल निट्टूरकर यांची जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड 
 आजरा, वृत्तसेवा :

 आजरा (जिल्हा कोल्हापूर) येथील विशाल अशोक निट्टूरकर याची सरळसेवा 2023  परीक्षेतून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

 आजरा येथील पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कालवा निरीक्षक अशोक निट्टूरकर यांचे सुपुत्र विशाल निट्टूरकर हे गेल्या सात आठ वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. विशाल यांचे प्राथमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आजरा येथे झाले. तेथे त्यांना संयोगिता सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. माध्यमिक शिक्षण व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे झाले. तेथे त्यांना शामराव चोडणकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण आजरा महाविद्यालय आजरा येथे तर पुढील शिक्षण कृषी महाविद्यालय कडेगाव या ठिकाणी झाले. सरकारी अधिकारी वर्ग एकचे स्वप्न बाळगून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विशालने पुणे येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये गेली सात आठ वर्ष अभ्यास केला. अथक प्रयत्नातून त्याने यशाला गवसणी घातली आहे. त्याच्या यशामध्ये आई-वडील, दोन बहिणी, कुटुंब व मित्रांचा मोलाचा वाटा आहे. मेहनत, जिद्द, चिकाटी व संयम ठेवल्यास यश नक्कीच प्राप्त होते असा मोलाचा सल्ला विशाल यांनी दिला आहे.
====================
जाहिरात....
शिवन्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आजरा 
 घरापासून घरापर्यंतचा सुखकर प्रवास.... 

आमच्याकडे 7 सीटर, 4 सीटर आरामदायी एसी/ नॉन एसी कार भाड्याने मिळतील.
बदली ड्रायव्हर मिळतील.
 संपर्क : 9765903651 /  7558675252 ( प्रवीण )
======================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...