Tuesday, October 22, 2024

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश

 मुंबई, वृत्तसंस्था :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  महायुतीने यासह उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे काही जागांवरती शेवटपर्यंत उमेदवार ठरले नव्हते. त्यामुळे त्याचा मोठा फटका महायुतीला बसला होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत  अजूनही चर्चा सुरु आहे. असं असलं तरी तीनही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडूनही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अखेर शिवसेनेकडे उमेदवारांची पहिली यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत उमेदवारांची यादी देखील लवकरच जाहीर होणार आहे. या पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना संधी मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीतून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर तर करवीर मधून माजी आमदार चंद्रदीप नरके यांची नावे पहिल्या यादीत समावेश आहेत.

========================
जाहिरात....
शिवन्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आजरा 
 घरापासून घरापर्यंतचा सुखकर प्रवास.... 

आमच्याकडे 7 सीटर, 4 सीटर आरामदायी एसी/ नॉन एसी कार भाड्याने मिळतील.
बदली ड्रायव्हर मिळतील.
 संपर्क : 9765903651 /  7558675252 ( प्रवीण )
======================
जाहिरात....
दिवाळीच्या रेडिमेड फराळासाठी आजरेकरांची पहिली पसंदी....
शंकर बेकर्स अँड स्वीट,
छ. संभाजी चौक, आजरा.
संपर्क : 9850372737
=====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...