माऊली पेंट्सचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; पेंटरांचा सायकल देऊन गौरव
आजरा, वृत्तसेवा :
आजरा तालुक्यासह परिसरात अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केलेले बर्जर रंग कंपनीचे अधिकृत विक्रेते माऊली पेंट्स आंबोली रोड आजरा या फर्मचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गेल्या वर्षात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पेंटरांचा गिअरची सायकल व ट्रॅव्हलर बॅग देऊन गौरव करण्यात आला.
माऊली पेंट्स या फार्मचे मालक ज्ञानदेव उर्फ प्रकाश जाधव व जाधव कुटुंबियांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माऊली पेंट्सच्या वर्धापन दिना निमित्य शुभेच्छा दिल्या. यावेळी फार्मचे मालक जाधव म्हणाले, आजरा तालुक्यासह परिसरातील ग्राहकांचा माऊली पेंट्सला मोठा प्रतिसाद लाभत आहे. माऊली पेंट्सने दर्जेदार रंग ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे फर्मने अल्पावधीतच बाजारपेठेत आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. ग्राहकांची सेवा हेच आमचे समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गतवर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या उत्तम भंडारी, हरिश कांबळे, सर्जेराव चव्हाण, विठोबा नावलकर , मुजीप मुराद या पेंटरांचा गिअरची सायकल देऊन तसेच इतर अनेक पेंटारांना ट्रॅव्हलर बॅग देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यासाठी बर्जर रंग कंपनीचे साईल तावरे, अभिजित साबळे, सूरज दळवी या अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. रंगाच्या क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केलेल्या माऊली पेंट्स आंबोली रोड आजरा या फर्मचं सर्वत्र कौतुक होत आहे.
=====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================
No comments:
Post a Comment