Wednesday, October 23, 2024

दादांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, 38 जणांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश

दादांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, 38 जणांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश 

मुंबई, वृत्तसंस्था : 

 राज्यातील विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील  288 मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. आज  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी  जाहीर करण्यात आली आहे.  विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात  आली. या यादीमध्ये  38 उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. अपेक्षेप्रमाणे बारामतीतून अजित पवार हे निवडणूक लढवणार आहेत. या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मधून विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ तर चंदगड मधून विद्यमान आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी :
बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
कागल- हसन मुश्रीफ 
परळी- धनंजय मुंडे
 दिंडोरी- नरहरी झिरवाळ
अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
श्रीवर्धन-  आदिती तटकरे
अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
 उदगीर- संजय बनसोडे 
अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
वाई- मकरंद पाटील
सिन्नर- माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
 इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
 शहापूर- दौलत दरोडा
 पिंपरी- अण्णा बनसोडे
 कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
अकोले - किरण लहामटे
वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण- शेखर निकम
मावळ- सुनील शेळके
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
 हडपसर- चेतन तुपे
 देवळाली- सरोज आहिरे
चंदगड - राजेश पाटील
इगतुरी- हिरामण खोसकर
तुमसर- राजे कारमोरे
पुसद -इंद्रनील नाईक
अमरावती शहर- सुलभा खोडके
नवापूर- भरत गावित
 पाथरी- निर्णला विटेकर
मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला
========================
जाहिरात....
शिवन्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आजरा 
 घरापासून घरापर्यंतचा सुखकर प्रवास.... 

आमच्याकडे 7 सीटर, 4 सीटर आरामदायी एसी/ नॉन एसी कार भाड्याने मिळतील.
बदली ड्रायव्हर मिळतील.
 संपर्क : 9765903651 /  7558675252 ( प्रवीण )
======================
जाहिरात....
दिवाळीच्या रेडिमेड फराळासाठी आजरेकरांची पहिली पसंदी....
शंकर बेकर्स अँड स्वीट,
छ. संभाजी चौक, आजरा.
संपर्क : 9850372737
=====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...