Wednesday, May 19, 2021

खत दरवाढ थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन; राधानगरी तालुका काँग्रेसचा इशारा

 

राधानगरी (प्रतिनिधी) :

केंद्र शासनाने केलेली खताची मनमानी दरवाढ तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राधानगरी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. 

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ करून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केलीय. एका हाताने दोन हजार रुपये शेतकऱ्या दिले खताची दरवाढ करून दुसऱ्या हाताने शेकर्‍यांकडून पैसे काढून घेतले जात आहेत.  रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन येईल. केंद्र शासनाने शेतीसाठी लागणाऱ्या डीएपी, युरिया, मिश्र खत अशा रासायनिक खतांच्या किंमतीत दीड पटीने वाढ केली आहे. शेतकरी नैसर्गिक संकटांनी आधीच कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. कोरोना महामारीच्या काळात खताची दरवाढ करून शेतकऱ्याची थट्टा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच कोरोना काळात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला कवडीमोल किंमत मिळत आहे. शेतातील शेतीमाल जागेवर कुजत पडला आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला असतानाच शेतीला लागणाऱ्या अनेक वस्तूंच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती वाढविणे चुकीचे आहे. अन्यायी दरवाढ तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी काँग्रेसचे राधानगरी विधानसभा मतदारसंघ समन्वयक सुशील पाटील कौलवकर, सदाशिव चरापले, संजयसिंह पाटील, उत्तम पाटील येळवडेकर, प्रभाकर पाटील चंद्रेकर, वैभव तहसीलदार, सागर धुंदरे, रवी पाटील, शहाजी कवडे, इंद्रजीत पाटील, राहुल चौगुले, बाजीराव चौगुले आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Monday, May 17, 2021

सह्यगिरी राज्यस्तरीय ऑनलाईन हस्ताक्षर स्पर्धेत स्वरा-आरोही गुरवचे नेत्रदीपक यश

                   

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र दिन व सह्यगिरी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सह्यगिरी कला, क्रीडा,साहित्य व शैक्षणिक विचार मंच साळवण, (ता. गगनबावडा जि. कोल्हापूर) यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन हस्ताक्षर स्पर्धा 2021 चे आयोजन करण्यात आले होते. "शाळा बंद पण शिक्षण सुरू" या उपक्रमांतर्गत सह्यगिरी शैक्षणिक विचारमंच यांच्यावतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन गटात ऑनलाईन हस्ताक्षर स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी स्व-हस्ताक्षरात लेखन केलेल्या पानाचा फोटो किंवा पीडीएफ व  स्वतः लेखन करत असतानाचा  व्हिडिओ संस्थेकडे व्हाट्सअपवर शेअर करून सहभाग नोंदवावयाचा होता. एकूण तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी स्व-हस्ताक्षरात मध्ये आपल्या इयत्ते च्या भाषा(मराठी) पुस्तकातील परिच्छेदाचे लेखन करावयाचे होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. तब्बल १९०९ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. 

या स्पर्धेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या स्पर्धेमध्ये पहिली- दुसरीच्या गटामध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लज. (ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर या शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या कुमारी स्वरा प्रशांत गुरव या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे पहिलीतच शिकणारी कुमारी आरोही अमोल गुरव या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व ऑनलाइन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. स्वरा व आरोहीला छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हादसिंह शिलेदार यांचे प्रोत्साहन लाभले. वर्गशिक्षका अनुपमा चौगुले व विद्या खतकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पालकांचे पाठबळ लाभले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सह्यगिरी शैक्षणिक विचारमंचचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, उपाध्यक्ष विलास पाटील, सचिव क्रांतिसिंह सावंत, कार्याध्यक्ष तानाजी तेली, खजानीस मनिष नायसे यांनी अथक व अविश्रांत परिश्रम घेतले. स्वरा व आरोहीच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Sunday, May 16, 2021

बसरेवाडी येथील आड गल्लीतील ओढा व रस्त्याची दुरावस्था; ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष


गारगोटी (प्रतिनिधी) :

 भुदरगड तालुक्यातील बसरेवाडी येथील आड गल्लीतील ओढा व रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेले आहे. सध्या येथील रहीवाशांना रस्त्यात ओढा कि ओढ्यात रस्ता हा प्रश्न पडलेला आहे. या गल्लीतील ओढा हा पुर्णपणे मुजलेल्या व दुरावस्थेत असलेला पहावयास मिळतो.ओढ्यावरील टाकलेला काँक्रिट ही खचलेला व पडलेला आहे.   अनेक वेळा येथील रहिवाशांकडून ग्रामपंचायतीला याची तोंडी व लेखी निवेदन देवुनही ग्रामपंचायत या प्रश्नाकडे सक्षम दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.ग्रामपंचायतीने गेली बरेच वर्षे  या ओढ्याचे कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम ग्रामपंचायतीने केले नाही.  त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


 बसरेवाडी येथील या आड गल्लीतील ओढा पक्के बांधकाम स्वरूपात नसल्याने हा सध्या पूर्णपणे मुजुन गेलेला आहे.त्यामुळे येणारे दुर्गंधयुक्त सांडपाणी हे ओढ्यात टुंबुन रस्त्यावर वाहते.त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.पावसाळ्यामध्ये डोंगरातून येणारे थेट  पाणी या ओढ्याला येते.त्यामुळे पावसाळ्यात हे पाणी ओढ्याबाहेर जाऊन रस्त्यावरून वाहते.व अनेकांच्या घरात शिरते.व रस्त्यावरून वाहणाऱ्या या पाण्यामुळे येथील रहिवाशांना ही ये-जा करण्यास त्रास होतो. तसेच या ओढ्याबाहेर ही शेतकऱ्यांनी कुंपण लावल्यामुळे रस्ता ही अरुंद झालेला आहे.या रस्त्यावर झाडाझुडपांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे येथील रहिवाशांना व वाहन चालकांना ही त्रास होत आहे. या ओढ्यात प्लास्टिक, काचा, इतर कचरा व झाडेझुडपांचे प्रमाण दिसुन येते. त्यामुळे सापांचे प्रमाण वाढलेले आहे व रहीवाशी वस्तीत ही आढळून येते. या गल्लीमध्ये लोकवस्तीचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात असताना व गेली कित्येक वर्ष हा प्रश्न रेंगाळलेला असताना देखील ग्रामपंचायत बसरेवाडी पदाधिकारी व प्रशासन मात्र या प्रश्नाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करून चालढकल करीत असल्याचे दिसत आहेत.या उदासीनतेमुळे  येथील रहिवाशांकडून ग्रामपंचायत विरोधात नाराजीचा सूर दिसत आहे.

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची विकास कामांबाबत उदासीनता!

 ग्रामपंचायत बसरेवाडी येथे नव्यानेच आलेले सुशिक्षित व युवा पदाधिकारी असल्याचे दिसत आहेत पण  सदर कामाची जिल्हा परिषदेतुन मंजूरी असतानाही  त्यांची विकासकामांबाबत उदासीनता व इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे दिसत आहे.या कामाला ते टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Tuesday, May 11, 2021

युवराज येडुरे यांची राज्य महा एनजीओ समितीच्या अध्यक्षपदी निवड


गारगोटी (प्रतिनिधी) : 

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र एन जी ओ समिती (महाराष्ट्र राज्य) च्या झूम मिटींग ऑनलाईन कार्यकारिणी बैठकीत युवराज रामचंद्र येडुरे यांची राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते शेणगाव (ता. भुदरगड) येथील स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते सामाजिक क्षेत्रात गेली बारा वर्ष कार्यरत आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र एनजीओ समितीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी चांगल्या पद्धतीचे काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी महाराष्ट्रातील एनजीओनी दिली. तसेच समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी डॉ. लक्ष्मी उमेश भारती (औरंगाबाद), राज्य सचिवपदी सचिन प्रकाश यादव (सांगली),  राज्य संपर्कप्रमुख संदिप शिवाजी बोटे, राज्य सदस्य डॉ.प्रियदर्शनी उमेश चोरगे, उषा वंसत देसाई, अमोल निवृत्ती गोरे यांची ऑनलाइन निवड प्रक्रिया मध्ये बहुमताने निवड करण्यात आली . 

नवनिर्वाचित अध्यक्ष युवराज येडुरे यांनी प्रत्येक विभाग प्रमुख व जिल्हा कार्यकारिणीची निवड केली आहे. निवडीनंतर नूतन अध्यक्ष युवराज येडुरे यांनी राज्य उपाध्यक्षपदी डॉ.लक्ष्मी भारती औरंगाबाद, राज्य सचिवपदी सचिन यादव सांगली, राज्य संपर्कप्रमुख संदिप बोटे, राज्य सदस्य डॉ.प्रियदर्शनी चोरगे, उषा देसाई, अमोल गोरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Tuesday, May 4, 2021

गोकुळमध्ये सत्तांतर; विरोधी आघाडीचा १७ जागी विजय तर सत्ताधारीला फक्त ४ जागा


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी गटाने सत्ताधारी गटाला हादरा देत तब्बल सतरा जागांवर विजय मिळविला. सत्ताधारी गटाचे केवळ चार उमेदवार विजयी झाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने इतिहास रचत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गोकुळमधील सत्तेला सुरूंग लावला.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : राजर्षी शाहू शेतकरी आघाडी (विरोधी गट) - सर्वसाधारण गट - अरूण डोंगळे - 1980, अभिजित तायशेटे - 1972, अजित नरके - 1972, नविद मुश्रीफ - 1959, शशिकांत पाटील-चुयेकर - 1923, विश्‍वास पाटील - 1912, किसन चौगले - 1889, रणजित कृष्णराव पाटील - 1872, नंदकुमार ढेंगे - 1867, कर्णसिंह गायकवाड - 1848, बाबासाहेब चौगले - 1814, प्रकाश पाटील - 1709, संभाजी पाटील - 1721, महिला गट - अंजना रेडेकर - 1872, भटक्‍या विमुक्त जाती-जमाती - बयाजी शेळके, इतर मागासवर्गीय - अमर पाटील, अनुसुचित जाती- डॉ. सुजित मिणचेकर. 
राजर्षी शाहू आघाडी (सत्ताधारी गट) - अंबरिशसिंह घाटगे - 1803, बाळासाहेब खाडे - 1715, चेतन नरके - 1762, शौमिका महाडिक - 1769.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...