Wednesday, May 19, 2021

खत दरवाढ थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन; राधानगरी तालुका काँग्रेसचा इशारा

 

राधानगरी (प्रतिनिधी) :

केंद्र शासनाने केलेली खताची मनमानी दरवाढ तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राधानगरी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. 

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ करून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केलीय. एका हाताने दोन हजार रुपये शेतकऱ्या दिले खताची दरवाढ करून दुसऱ्या हाताने शेकर्‍यांकडून पैसे काढून घेतले जात आहेत.  रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन येईल. केंद्र शासनाने शेतीसाठी लागणाऱ्या डीएपी, युरिया, मिश्र खत अशा रासायनिक खतांच्या किंमतीत दीड पटीने वाढ केली आहे. शेतकरी नैसर्गिक संकटांनी आधीच कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. कोरोना महामारीच्या काळात खताची दरवाढ करून शेतकऱ्याची थट्टा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच कोरोना काळात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला कवडीमोल किंमत मिळत आहे. शेतातील शेतीमाल जागेवर कुजत पडला आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला असतानाच शेतीला लागणाऱ्या अनेक वस्तूंच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती वाढविणे चुकीचे आहे. अन्यायी दरवाढ तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी काँग्रेसचे राधानगरी विधानसभा मतदारसंघ समन्वयक सुशील पाटील कौलवकर, सदाशिव चरापले, संजयसिंह पाटील, उत्तम पाटील येळवडेकर, प्रभाकर पाटील चंद्रेकर, वैभव तहसीलदार, सागर धुंदरे, रवी पाटील, शहाजी कवडे, इंद्रजीत पाटील, राहुल चौगुले, बाजीराव चौगुले आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...