कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी गटाने सत्ताधारी गटाला हादरा देत तब्बल सतरा जागांवर विजय मिळविला. सत्ताधारी गटाचे केवळ चार उमेदवार विजयी झाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने इतिहास रचत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गोकुळमधील सत्तेला सुरूंग लावला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : राजर्षी शाहू शेतकरी आघाडी (विरोधी गट) - सर्वसाधारण गट - अरूण डोंगळे - 1980, अभिजित तायशेटे - 1972, अजित नरके - 1972, नविद मुश्रीफ - 1959, शशिकांत पाटील-चुयेकर - 1923, विश्वास पाटील - 1912, किसन चौगले - 1889, रणजित कृष्णराव पाटील - 1872, नंदकुमार ढेंगे - 1867, कर्णसिंह गायकवाड - 1848, बाबासाहेब चौगले - 1814, प्रकाश पाटील - 1709, संभाजी पाटील - 1721, महिला गट - अंजना रेडेकर - 1872, भटक्या विमुक्त जाती-जमाती - बयाजी शेळके, इतर मागासवर्गीय - अमर पाटील, अनुसुचित जाती- डॉ. सुजित मिणचेकर.
राजर्षी शाहू आघाडी (सत्ताधारी गट) - अंबरिशसिंह घाटगे - 1803, बाळासाहेब खाडे - 1715, चेतन नरके - 1762, शौमिका महाडिक - 1769.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
No comments:
Post a Comment