कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यात कृत्रिम वाळूचे धोरण जाहीर केले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. एम सॅण्ड (कृत्रिम वाळू) युनिट उभारणीसाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी शासन निर्णय व शासन पत्रातील नमूद कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ऑफलाईन पध्दतीने तसेच महाखनिज प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हा खनीकर्म अधिकारी स्वप्निल पवार यांनी केले आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे - मिळकतीचा चालू 7/12 उतारा, वैयक्तिक अर्ज असल्यास अर्जदार यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड, संस्थेचा अर्ज असल्यास संस्थेबाबतची कागदपत्रे, उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र, रुपये 500/- इतकी अर्ज फी, एम सॅण्ड युनिट ज्या ठिकाणी स्थापन करावयाचे आहे त्याकरिता MPCB कडून प्राप्त CTE, युनिटमधून 100 टक्के एम सॅण्ड उत्पादित करण्याबाबतचे रु.100/- च्या स्टॅम्प पेपरवरील हमीपत्र, एम सॅण्ड उत्पादित करण्यासाठी दगड कोणत्या खाणपट्टयातून व इतर स्रोतांतून (Source) आणण्यात येणार आहेत, त्या खाणपट्टयाचा अथवा स्रोताचा तपशील इत्यादी आवश्यक.
यापूर्वी संबंधित एम सॅण्ड उत्पादन करणाऱ्या युनिटधारकाने महाखनिज या संगणक प्रणालीवर अर्ज केला असल्यास त्यांनी पुन्हा नव्याने खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ऑफलाईन पध्दतीने तसेच महाखनिज प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच एम सॅण्ड/ कृत्रिम वाळूच्या खाणपट्ट्याच्या अर्जाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.nic.in या संकेतस्थळावर शासन निर्णय व शासनपत्र माहितीस्तव उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर अथवा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसिल कार्यालये या ठिकाणी संपर्क साधावा, असे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
=========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment