आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
जनता बॅंक आजराने सर्वसामान्य केंद्रबिंदू मानून कारभार केला आहे. कायम ग्राहकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात या बॅंकेची ओळख बहुजनाची बॅंक म्हणून आहे. बॅंकेने शेतकरी, महीला बचत गट, तरुण उद्योजक व समाजातील विविध घटकांना आर्थिक बळ देण्याचे काम केले आहे. गारगोटी येथे स्थापन केलेली नवीन शाखाही बॅंकेच्या नावलाैकिकाला साजेसा कारभार करेल, असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. गारगोटी (ता. भुदरगड) येथे जनता बॅंक लि., आजरा या बॅंकेच्या २१ व्या शाखेचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. माजी आमदार के. पी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार बजरंग देसाई, गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहूल देसाई, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष शामराव देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी ग्राहकांच्या सोयीसाठी बॅंकेने आयफोन मोबाईल ऍप ही सेवा सुरु केली आहे. याचे उद्घाटन माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते झाले.
संचालक रणजित देसाई यांनी स्वागत केले. बॅंकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, बॅंकेने अद्यावत व तत्पर सेवा पुरवली आहे. याचा लाभ गारगोटी परिसरातील ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन केले. बॅंकेचे मुख्यव्यवस्थापक ए. बी. पाटील यांनी बॅंकेच्या कामकाजाची माहीती दिली. बॅंकेने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळासह विविध महामंडळे, शासनाच्या योजना राबविल्या आहेत. याचा लाभार्थांना फायदा होत आहे. बॅंकेला ५ कोटी ५७ लाखांचा यंदा नफा झाला आहे. बॅंकेचा ७७६ कोटी ६८ लाखांचा एकूण व्यवसाय आहे. माजी आमदार के. पी. पाटील, बजरंग देसाई यांनी शुभेच्छा दिल्या व बॅंकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. या वेळी ग्राहक मेळावाही झाला. बॅंकेचे उपाध्यक्ष अमित सामंत, महादेव टोपले, पांडुरंग तोरगले, विक्रमसिंह देसाई, एस. डी. पाटील, शशिकांत नार्वेकर, जयवंत कोडक, नंदाताई केसरकर, महेश कांबळे, असिस्टंट मॅनेजर पांडुरंग सरंबळे, वसुली अधिकारी माणिक सावंत, अकाैंटट सुहास चाैगुले, संदिप पाटील यांच्यासह ग्राहक व सभासद उपस्थित होते. संचालक संतोष पाटील यांनी आभार मानले.
=========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment