आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी (ता. आजरा) येथे संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन पेद्रेवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील चव्हाण यांनी केले होते. ही बैठक पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आली होती. यावेळी आजरा तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी शिवदास मुंडे (मुख्याध्यापक, भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी), उपाध्यक्षपदी वामन सामंत (मुख्याध्यापक, मडिलगे हायस्कूल), सचिव पदी रविंद्र महापुरे (मुख्याध्यापक, उत्तुर विद्यालय), खजिनदारपदी संजीव देसाई (मुख्याध्यापक, पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा) यांची निवड झाली आहे.
यापूर्वी मुख्याध्यापक संघाची बैठक २२ ऑक्टोबरला माध्यमिक विद्यालय आर्दाळ येथे शरद पाटील यांनी आयोजित केली होती. त्या बैठकीत तालुका संघाची नवीन कार्यकारणी स्थापन करण्यात आली होती. या
नवीन कार्यकारणीच्या सदस्यपदी राजेंद्र कुंभार (भादवण हायस्कूल), सुरेश कांबळे (वसंतदादा हायस्कूल उत्तुर), दीपक कांबळे (महागोंड हायस्कूल), चंद्रकांत घुणे (गवसे हायस्कूल), सुनीता मुरूकटे (चाफवडे हायस्कूल), कल्पना पाटील (निंगुडगे हायस्कूल) या मुख्याध्यापकांची निवड झाली होती. तसेच सल्लागारपदी संजय देवकर, शरद पाटील, उदय आमणगी, अजित तोडकर, सुनील चव्हाण हे मुख्याध्यापक काम पाहणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक सुनिल चव्हाण सर यांनी मांडले. मार्गदर्शन शरद पाटील यांनी केले.
=======================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment