Tuesday, December 2, 2025

आजरा नगरपंचायतीसाठी 77.86 टक्के मतदान

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष व 17 नगरसेवक पदाच्या जागांसाठी मंगळवारी झालेल्या मतदानात सरासरी 77.86 टक्के मतदान झाले. एकूण 14 हजार 686 मतदारांपैकी 11 हजार 434 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 जण रिंगणात होते. गेले आठ दिवस शहरात प्रचाराचा धुरळा उडाला होता. मंगळवारी 19 केंद्रावर मतदान प्रक्रिया झाली. सर्वच ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. 7 हजार 419 पुरुष मतदारांपैकी 5 हजार 829 तर 7 हजार 267 महिला मतदारांपैकी 5 हजार 605 इतके मतदान झाले.

प्रभागनिहाय झालेले मतदान : (एकूण मतदान, झालेले मतदान, टक्केवारी)
प्रभाग एक : 612, 460, 75%
प्रभाग दोन : 1059, 835, 79%
प्रभाग तीन : 864, 726, 84%
प्रभाग चार : 602, 485, 81%
प्रभाग पाच : 424, 355, 84%
प्रभाग सहा : 445, 359, 81%
प्रभाग सात : 886, 658, 74%
प्रभाग आठ : 1535, 1148, 75%
प्रभाग नऊ : 1398, 1061, 76%
प्रभाग दहा : 1010, 856, 85%
प्रभाग अकरा : 755, 555, 74%
प्रभाग बारा : 1086, 849, 78%
प्रभाग तेरा : 1108, 799, 72%
प्रभाग चौदा : 442, 380, 86%
प्रभाग पंधरा : 830, 635, 77%
प्रभाग सोळा : 915, 667, 73%
प्रभाग सतरा : 715, 606, 85%


===============================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...