Friday, November 28, 2025

भाकप (माले) व सर्व श्रमिक संघाचा आजरा परिवर्तन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा.

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा शहरातील गिरणी कामगार आणि पेन्शनर संघटनेचा लढा भाकप (माले) आणि सर्व श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू आहे. संघटनेशी संबंधित दोन-अडीजशे मते कोणाला द्यायची याबाबत संघटनेच्या कार्यालयात कॉ शांताराम पाटील यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या परिवर्तन आघाडीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय झाला.
    
यावेळी आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयभाऊ सावंत आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्यध्यक्ष कॉ संपत देसाई यांनी आघाडीची भूमिका मांडली. लोकाभिमुख पारदर्शी कारभार आणि आजरा शहराचा विकास हाच आमच्या आघाडीचा अजेंडा असून गिरणी कामगार आणि पेन्शनरांच्या सर्व लढयात आमचे उमेदवार सक्रिय सहभाग घेतील असा विश्वास ही देण्यात आला.
    
बैठकीला नारायण भडांगे, विजय पाटील, निवृत्ती मिसाळ, विष्णू भोगण, हिंदुराव कांबळे, धोंडिबा कंबळे, महादेव होडगे, बाबू घाटगे, संदीप येसने, संभाजी निवळे, संजय घाटगे, काशिनाथ मोरे इत्यादी उपस्थित होते.
============================

No comments:

Post a Comment

होनेवाडीत रस्ते कामाचा शुभारंभ; अशोकअण्णा चराटी, जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : होनेवाडी (ता. आजरा) येथे जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आजरा तालुक्य...