Thursday, October 2, 2025

आजरा नगरपंचायत मार्फत व्यंकटराव हायस्कूलमध्ये कचरा व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये आजरा नगरपंचायत मार्फत स्वच्छ संरक्षण 2025 व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत  विद्यार्थ्यांना कचऱ्याचे प्रकार त्याच बरोबर कचरा व्यवस्थापन या बाबत मोलाचे मार्गदर्शन पेडणेकर सर व त्यांचे सहाय्यक कांबळे सर यांनी केले. त्यांनी प्रश्न उत्तरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलते केले. समर्पक उत्तर देणाऱ्याला चांगला पेन भेट दिला, त्याच बरोबर प्रशालेला कचऱ्याचे व्यवस्थापन असणारे कॅलेंडर भेट दिले. कापडी कचरा पेटी आणि प्रमाणपत्र ही प्रदान केले. सहावी अ च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार व वर्गशिक्षिका श्रीम. आर. एन. पाटील उपस्थित होत्या.
================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...