Friday, October 3, 2025

व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे संचालक श्री पांडुरंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव श्री अभिषेक शिंपी यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना प्रथम व्यंकटराव परिवारातर्फे  विजयादशमीच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व सांगितले की या सणाचा एक योगायोग असा आहे की सत्याचा असत्यावर विजय असा हा दिवस आणि ज्या गांधीजींनी सत्याचा मार्ग दाखवला त्या गांधीजींबद्दल आज समाजामध्ये खोटे- नाटे पसरवून छोटी छोटी मुलं त्यांच्याबद्दल उद्विग्न भावना व्यक्त करताताना दिसत आहेत. गांधींजींचे खरे विचार या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य आपण जबाबदारी पूर्वक करणे गरजेचे आहे. हा विचार खऱ्या अर्थाने मुलांपर्यंत पोहोचवायचे कार्य शिक्षिकांवर अवलंबून आहे. त्याचबरोबर तोच विचार देशाला आणि समाजाला पुढे नेणारा आहे. एकमेकांवर ईर्षा करण्यापेक्षा साधी रहाणी, खेड्याकडे चला, कृषी संसाधनाला महत्त्व द्या.  हे महात्मा गांधीजींनी आचरणातून शिकविले. गांधीजी फक्त स्वातंत्र्य सैनिकच नव्हते तर ते तत्त्ववादी, मानवतावादी अशा विचाराचे पुरस्कर्ते  होते. त्यांनी  मांडलेल्या आणि जगलेल्या तत्त्वांचा  विचार समाजातील शेवटच्या घटकालाही पुढे नेणारा आहे. महात्मा गांधीजींनी पर्यावरणाचे रक्षण आणि स्वच्छता अभियान यावर त्यांच्या जीवनात महत्त्व देऊन कार्य केलेले आहे. पर्यावरणाला, भूतदयेला, लहान मुलांना ,माता भगिनींना, शेती व्यवसायाला, जगाच्या सर्वांगीण विकासाचे तत्त्वज्ञान हा विचार आपल्या  मुलांपर्यंत आणि येणाऱ्या पुढच्या पिढीकडे पोहोचवावा लागेल त्यामुळे तुमच्या हातात हा सगळा विषय आहे.  येणाऱ्या पाच 25 पिढ्या तुमच्या हाताखालून जाणार आहेत तर त्यांना तुमच्याकडून जे शिक्षण मिळते ते खरे असते प्रशिक्षकांबद्दल मुलांच्या मनात असलेला विश्वास जो असतो तो प्रामाणिक आणि एक दैवत, देवतेच्या भावनेचा विश्वास असतो त्यामुळे तुम्ही  जे काय आहे गांधी विचार मांडला पाहिजे. जो उलटा विचार आहे राज्यसत्ता, राष्ट्रसत्ता त्या उलट्या विचाराला बळ द्यायला लागले आहे .हा खोटा विचार आहे ही प्रोसेस आहे तो कालांतराने त्या मुलांच्या कुटुंबाच्या समाजाच्या आणि सगळ्याच लोकांचे विचार कुठलाही राष्ट्राची निर्मिती करू शकत नाही ज्या ज्या ठिकाणी कट्टर वाद आहे ते राष्ट्र लयाला गेलेली आहेत ही जगभरातली उदाहरणे एका बाजूला व चिन आणि अमेरिकेचे जागतिक युद्ध चालू आहे या काळात जे खरं चाललंय जगात ते आपल्यालासुद्धा कळण्यासाठी व्यासपीठ निर्माण करूया. चायना आज जगात सर्वात पुढे आहे त्यामानाने आपण खूपच मागे आहोत.. यासाठी आपल्याला चीन भाषा सुद्धा अवगत असणे गरजेचे आहे.. त्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावे असे मला वाटते त्याद्वारे आपल्या देशाला आणखीन वेगाने प्रगती करता येईल. लोकसंख्या वाढ ही आपल्या प्रगतीच्या आड येणारी गोष्ट नसून एकमेकाच्या द्वेष करणे थांबवून ब्रॉड माइंडेड विचार  असायला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांनाही जे खरं आहे,  जे त्याच्या गल्लीच्या, गावाच्या ,आणि देशाच्या भल्याच आहे तो विचार करण्यासाठी व आमलात आणण्यासाठी आज गांधीजींच्या जयंती निमित्त प्रोत्साहित करूया असे प्रेरणादायी विचार मांडले.
  
सौ. एन. सी. हरेर यांनीही आपल्या मनोगतातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन कार्य कथन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक कृष्णा पटेकर, सचिन शिंपी, सुधीर जाधव, प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, प्राथमिक मुख्याध्यापक आर. व्ही. देसाई, शिवाजी पारळे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पन्हाळकर, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन  सौ. एल. पी. कुंभार, प्रास्तविक पी. व्ही. पाटील यांनी व आभार एन. एन. पाष्ठे यांनी मानले.
=====================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...