आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
सोने तारण कर्ज देणाऱ्या कंपनीच्या आजरा शाखेत ग्राहकांशी संगणमत करून बनावट सोने ठेवून घेवून ग्राहकांना कर्ज देणे व त्यापैकी काही रक्कम स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी घेणे तसेच ग्राहकांनी कपंनीमध्ये तारण ठेवलेले खरे सोन्याचे दागिने बदलून त्याजागी बनावट दागिने ठेवून अपहार केल्याप्रकरणी आठ जणांवर आजरा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. दिनकर रामचंद्र वडर (रा. कानडेवाडी, ता. गडहिंग्लज), स्नेहल शिवाजी माडभगत (रा. दर्डेवाडी, ता. आजरा), इरशाद अहमद चाँद, (रा. फकीरवाडा आजरा), शांताराम पांडुरंग कांबळे (रा. कानडेवाडी, ता. गडहिंग्लज), गणेश आनंदा सावंत (रा. अवचितनगर बांबवडे, ता. शाहुवाडी), गुणाजी विष्णु नेवगे (रा. पोळगाव ता. आजरा), विजय तानाजी देसाई (रा. कानडेवाडी, ता. गडहिंग्लज), नोवेल जोसेफ लोबो (रा. शिवाजीनगर आजरा ता. आजरा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, 20 सप्टेंबर 2024 ते 14 मे 2025 या कालावधीत दिनकर रामचंद्र वडर व स्नेहल शिवाजी माडभगत यांनी इरशाद अहमद चाँद, शांताराम पांडुरंग कांबळे, गणेश आनंदा सावंत, गुणाजी विष्णु नेवगे, विजय तानाजी देसाई व नोवेल जोसेफ लोबो यांचेशी संगणमत करून त्यांचेकडून बनावट सोने कंपनीच्या आजरा शाखेत ठेवुन घेवुन त्यांना कर्ज रक्कम देवुन त्यापैकी काही रक्कम स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता घेऊन कंपनीची फसवणूक केली आहे. तसेच जीवन गोविंद शेवाळे (रा. पोळगाव ता. आजरा) व हारून निजाम खान अलियास फकीर (रा. जोशी गल्ली आजरा) यांनी सदर कंपनीमध्ये तारण ठेवलेल्या सोन्याचे खरे दागिणे हे वडर व माडभगत यांचे कस्टडीमध्ये असताना त्यांनी परस्पर सदर सोन्याचे दागिणे हे पॅकेटमधून काढून त्याजागी बनावट दागिने ठेवून 21 लाख 52 हजार 183 रुपये कर्ज रक्कमेच्या एकुण 471.5 ग्रॅम ख-या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. त्यामुळे आठ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
==================
Subscribe to:
Post Comments (Atom)
महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment