आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
साळगाव (ता. आजरा) येथील भगवा रक्षक कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार दि. 22 सप्टेंबर ते गुरुवार दि. 2 ऑक्टोबर पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने गेली वीस वर्षे ग्रामदैवत केदारलिंग मंदिराच्या प्रांगणात दुर्गामातेचा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाचे यंदाचे 21 वे वर्ष आहे.
यावर्षी मंडळाच्या वतीने पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, सोमवार (दि. 22) दुपारी 12.00 वाजता : दुर्गामाता आगमन सोहळा, रात्री 9.00 वाजता : माऊली भजनी मंडळ साळगाव यांचे भजन, मंगळवार (दि. 23) रात्री 9.00 वाजता : केदारलिंग भजनी मंडळ साळगाव यांचे भजन, बुधवार (दि. 24) रात्री 9.00 वाजता : ह. भ. प. राहुल महाराज कदम (इचलकरंजी) यांचे कीर्तन
कीर्तनसाथ : विठ्ठल रखुमाई सांप्रदाय मंडळ व ग्रामस्थ साळगाव, गुरुवार (दि. 25) सप्टेंबर रात्री 9.00 वाजता : फनी गेम्स (शालेय विद्यार्थ्यांसाठी), शुक्रवार (दि. 26) दुपारी 12.00 वाजता : हळदीकुंकू (महिलांसाठी), रात्री 9.00 वाजता : फनी गेम्स (महिला व युवतींसाठी), शनिवार (दि. 27) रात्री 9.00 वाजता : झी मराठी, कलर्स मराठी वाहिनीवरील विविध मालिकामध्ये तसेच शिवपुत्र संभाजी महानाट्यमध्ये येसाजी कंकची भूमिका केलेले संतोष चव्हाण यांचा स्टेज हिप्नॉटिझमचा धमाल कॉमेडी व करमणुकीचा कार्यक्रम. रविवार (दि. 28) रात्री 8.00 वाजता : महाप्रसाद, सोमवार (दि. 29) रात्री 8.00 वाजता : रास दांडिया गरबा, मंगळवार (दि. 30) सायंकाळी 7.30 वाजता : महाआरती (महिलांसाठी लकी ड्रॉ), रात्री 8.00 वाजता : रास दांडिया गरबा, बुधवार (दि. 1 ऑक्टोबर), रात्री 8.00 वाजता : रास दांडिया गरबा, गुरुवार (दि. 2) सकाळी 6.30 वाजता : दुर्गामाता महादौड (सुरुवात : हनुमान-विठ्ठल रुखमाई मंदिर साळगाव), सायंकाळी 6.00 वाजता विसर्जन मिरवणूक विशेष आकर्षण : हलगी आणि भागात प्रथमच काहीतरी नवीन. दररोज ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिर व श्री दुर्गामाता उत्सव येथे दररोज सकाळी 7.30 वाजता व सायंकाळी 7.30 वाजता आरती होईल. या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष अंकुश पाटील, धनंजय पाटील, संदीप वेंगुळकर, सुभाष पाटील, संदीप केसरकर यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment