आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
भूगोल व पर्यावरण शास्त्र विभागाच्या वतीने 16 व्या जागतिक बांबू दिनानिमित्त आजरा महाविद्यालय, आजरा येथे “बांबू हस्तकला मार्गदर्शन व प्रशिक्षण” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागत प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले, तर प्रास्ताविक रणजीत कालेकर यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बांबूचे पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक मा. रितेश ढोले (बांबू डिझायनर व टेक्स्टाईल इंजिनिअर, नागपूर) होते. त्यांनी बांबूच्या विविध प्रजाती, त्यांचे उपयोग, तसेच बांबूपासून तयार होणाऱ्या हस्तकलावस्तूंचा सखोल आढावा घेतला. विशेषत: बांबूपासून बनणाऱ्या वस्तूंची निर्मिती कौशल्य, निर्मिती मूल्य व बाजार मूल्य, स्थानिक , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, त्यांची विक्री क्षमता व मूल्य याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच हिरण्यकेशी बांबू ग्राम विकास गट व अश्वघोष बांबू रोपवाटिका व स्टुडिओचे चे बांबू अभ्यास सतीश कांबळे यांनी आजरामध्ये असणाऱ्या व माणगा मेसकाठी या प्रजातीच्या बांबूपासून विविध प्रकारचे वस्तू निर्मिती प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र पवार इंडस्ट्रीज येथे दिले जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शिक्षणाबरोबरच हस्त कौशल्य आत्मसात करून स्थानिक परिसरातच उद्योग व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या भागाचा विकास साधता येईल असे मत व्यक्त केले
या प्रसंगी मा. रितेश ऊकेले (बांबू इंजिनिअर, वर्धा), मा. सतीश कांबळे (बांबू अभ्यासक व संस्थापक, अश्वघोष बांबू रोपवाटिका व बांबू स्टुडिओ) तसेच रणजीत कालेकर (प्रवर्तक, आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशन) हे मान्यवर विशेष उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ICAR, बेंगळुरू येथील संशोधक विद्यार्थी यशवंत कुमार, किशोर यादव, सुधा सुमन व हर्षद देसाई यांचा सहभाग विशेष ठरला. त्याचबरोबर डॉ. धनंजय पाटील, प्रा. विठ्ठल हाके, प्रा. नेहा पेडणेकर, प्रा. वैशाली देसाई व प्रा. सुवर्णा धामणेकर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला शैक्षणिक व संशोधनात्मक दिशा लाभली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मनोजकुमार पाटील, उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, हिरण्यकेशी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक मा.अनिकेत चराटी, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, श्री. सतीश कांबळे व श्री. कृष्णा वरेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी व सूत्रसंचालन डॉ.रणजीत पवार यांनी केले. आभार डॉ धनंजय पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास बांबू पासून बनवलेल्या विविध जीवन उपयोगी, घरगुती व सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी, ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला.
============
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment