कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) वतीने ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संघाचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहन करणेत आले. यावेळी संचालक किसन चौगले, प्रकाश पाटील, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.
यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य दिन हा आपल्यासाठी अभिमानाचा, सन्मानाचा तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना व स्वातंत्र्यसैनिकांना वंदन करण्याचा दिवस आहे. गोकुळ दूध संघाने नेहमीच शेतकरी, ग्राहक व कर्मचारी यांच्या प्रगतीसाठी कार्य केले आहे. आपण सर्वांनी मिळून एकता, प्रामाणिकपणा व गुणवत्तेची मूल्ये जपत गोकुळला आणखी प्रगती पथावर नेऊया असे मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वितरक, ग्राहक व कर्मचारी यांना ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गोकुळ प्रकल्पाबरोबरच संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथील ध्वजारोहन संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे हस्ते, लिंगनूर चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, तावरेवाडी चिलिंग सेंटर संचालक बयाजी शेळके, गोगवे चिलिंग सेंटर संचालक कर्णसिंह गायकवाड, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक सुजित मिणचेकर, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी संचालक बाबासाहेब चौगले, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल संचालक मुरलीधर जाधव व बोरवडे चिलिंग सेंटर ज्येष्ठ कर्मचारी अशोक डोंगळे यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत करणेत आले. यावेळी सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदिप पाटील, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (पशुसंवर्धन) डॉ.प्रकाश साळुंखे, व्यवस्थापक (संकलन) दत्तात्रय वाघरे, डॉ.प्रकाश दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
================
Subscribe to:
Post Comments (Atom)
कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment