Wednesday, August 13, 2025

शेळप ग्रामपंचायत कर्मचारी शंकर नवार यांचा प्रामाणिकपणा; सापडलेले पैसे परत देऊन दाखवला चांगुलपणा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुक्यातील शेळप ग्रामपंचायत कर्मचारी शंकर नवार यांनी सापडलेले पैसे प्रामाणिकपणे परत आजही समाजात चांगुलपणा टिकून आहे हे दाखवून दिले. कॉ. संपत देसाई, तानाजी देसाई, रवींद्र भाटले हे शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चाच्या तयारीसाठी शेळप येथे गेले असता संपत देसाई यांचे पाकीट तिथंच पडले. रात्री दोन-तीन बैठका करून कॉ. देसाई घरी परत आल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. सावंतवाडी येथील मित्र आणि कार्यकर्ते राजेंद्र कांबळे यांनी परवा दुपारी मित्राला देण्यासाठी वीस हजार रुपये कॉम्रेड देसाई यांचे कडे दिले होते. ते तसेच खिशात तसेच ठेवून कॉ. देसाई शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चाच्या तयारीसाठी खेडगे, पारपोली, शेळप आणि दाभिल येथे गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यानंतर पैसे आणि पाकीट हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या गावातील कार्यकर्त्यांना पैसे हरवल्याचे सांगून, सापडले तर कळवा म्हणून कॉम्रेड देसाई जेऊर येथे मोर्चाच्या बैठकीसाठी निघाले. त्याचवेळी शंकर नवार यांचा त्यांना फोन आला व आपले पाकीट आणि पैसे माझ्याकडे असल्याचे सांगितले. सापडलेले पैसे परत करणाऱ्या शंकर नवार या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक  सगळीकडे होत आहे.
==============

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...