आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
संकेश्वर-बांदा महामार्गावर आजरा शहरानजीक मसोली येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. या टोलनाक्यावर शुक्रवार (दि. 18 जुलै) पासून टोल वसुलीचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले होते. मात्र आजरा तालुक्यातील जनतेने टोल देणार नाही हा निर्धार करीत टोल नाक्यावर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेत आंदोलकांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हा प्रशासन यांच्या समवेत बैठक घेण्याचे, त्याचबरोबर या बैठकीतील निर्णयानंतरच मसोली टोलनाक्यावरून टोल वसुली करण्यात येईल असे लेखी पत्र आंदोलकांना दिल्यानंतर टोल विरोधातील आंदोलन थांबवण्यात आले. त्याचबरोबर शुक्रवार (18 जुलै) पासून सुरू करण्यात येणाऱ्या टोल वसुलीला देखील स्थगिती देण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनाचे नेतृत्व संकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीने केले.
संकेश्वर-बांदा महामार्गातील संकेश्वर ते आंबोली पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. आजरा शहराजवळ मसोली येथे टोल नाका उभारणी करण्यात आली आहे. या टोलनाक्यावर आजरा तालुक्यातील जनतेला टोल मुक्ती मिळावी अशी मागणी आहे. याबाबत यापूर्वी आजरा बंद, रास्ता रोको, मोर्चा, निदर्शने करण्यात आली आहेत. मात्र गुरुवार (दि. 17 जुलै) च्या काही वृत्तपत्रांमध्ये या टोल नाक्यावरील दरपत्रक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध करत शुक्रवार (दि. 18 जुलैपासून) टोल वसुलीचे नियोजन लावले होते. यामुळे तालुक्यात संतापाचे वातावरण तयार झाले होते. याला विरोध करण्यासाठी शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून कार्यकर्ते मसोली येथील टोलनाक्याजवळ जमू लागले. त्यामुळे सकाळच्या सत्रात टोल नाक्याजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या टोलमधून आजरा तालुक्याला पूर्णपणे वगळण्यात यावे, अशी आंदोलकांची मागणी होती. याबाबत सुरुवातीला महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, मात्र सुरुवातीच्या सत्रात योग्य तो तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलकांनी टोल नाक्याजवळच ठिय्या मांडला.
यावेळी बोलताना आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई म्हणाले, आजरा तालुक्यावर सातत्याने अन्याय सुरू आहे. ही लोकप्रतिनिधींसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. संकेश्वर-बांदा रस्त्यासाठी महामार्गाचे नियम पाळले गेले नाहीत त्यामुळे टोल वसुलीची घाई का?. टोलमुक्ती संघर्ष समितीचे परशुराम बामणे म्हणाले, आजरा तालुक्यातील जनतेला पूर्णपणे टोलमुक्ती झाल्याशिवाय संघर्ष समितीचे आंदोलन थांबणार नाही. आजरा साखर कारखान्याचे संचालक अनिल फडके म्हणाले, लोकशाही पद्धतीने टोल बंद झाला नाही तर टोल हिरणकेशी नदीत विसर्जित करण्यात येईल. मराठा महासंघाचे मारुती मोरे म्हणाले, विविध प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेने त्याग केला आहे. मात्र प्रकल्पाचा उपभोग घेणाऱ्यांना तालुक्यातील जनतेच्या त्यागाशी काहीही सोयरसुतक नाही. टोलच्या बाबतीत लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेत आहेत. प्रभाकर कोरवी म्हणाले, विविध माध्यमातून आजरा तालुक्यावर अन्याय करत तालुक्याचे अस्तित्व पुसण्याचा डाव रचला जात आहे. प्रकाश मोरूस्कर म्हणाले, टोलबाबत बैठक घेण्याचे आश्वासन पाळले नाही. पालकमंत्र्यांनी आजऱ्याकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे तालुक्याला कोणी वाली राहिला नाही. शिवसेना ठाकरे गटाचे युवराज पोवार म्हणाले, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने टोल आजरा तालुक्यावर लादला आहे. महामार्ग अपूर्ण असताना शासनाला टोलची गडबड का आहे? निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आश्वासने लोकप्रतिनिधी विसरले असतील पण जनता विसरलेली नाही. तालुक्याशी संबंधित पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजी पाटील यांनी टोलबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. सुधीर कुंभार म्हणाले, विकासाला कुणाचाही विरोध नाही मात्र तालुक्यातील जनतेला टोल माफ झाला पाहिजे.
यानंतर आंदोलकांनी तहसीलदार समीर माने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करत आजरा तालुक्यातील जनतेला टोल मधून सवलत द्यावी आणि टोलनाका सुरू करावा अशी मागणी केली. याला अधिकाऱ्यांनी नकार दिला. अखेर आंदोलकांनी टोलबाबत बैठक घ्यावी व या बैठकीनंतरच टोल नाका सुरू करावा, अशी मागणी केली. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून लेखी पत्र देण्याचे मान्य केले. त्यानुसार आगामी काळात पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्या समवेत आंदोलकांची बैठक घेण्याची तसेच बैठक होत नाही तोपर्यंत टोल वसुली सुरु होणार नसल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी संभाजी पाटील, सुभाष देसाई, रणजीत देसाई, दिगंबर देसाई, राजू होलम, संजय पाटील, इंद्रजीत देसाई, रणजीत सरदेसाई, संकेत सावंत, सुधीर सुपल, महेश पाटील, ओमकार माद्याळकर, धनाजी राणे, शांताराम पाटील, अविनाश हेब्बाळकर यांच्यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आजरा साखर कामगारांची लक्षणीय उपस्थिती...
मसोली टोल नाक्याचा सर्वाधिक फटका गवसे येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी साखर कारखान्यास बसणार आहे. त्यामुळे या कारखान्याचे संचालक तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबीटकरांच्या सूचनेनुसार टोल बंद...
दरम्यान आजरा तालुक्यातील जनतेला कोणतीही पूर्वसूचना न देता शुक्रवारपासून टोल वसुलीचे काम सुरू करण्यात येणार होते. या विरोधात तालुक्यातील जनतेने आंदोलन केले आहे. हे समजताच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन बैठक घेणार आहे. तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा टोल वसूल करू नये, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व तहसीलदार यांना सुचित केले. तशी पत्र टोलमुक्ती संघर्ष समितीला देण्याचे आदेश दूरध्वनी वरून दिले. मंत्री आबिटकर यांच्या सूचनेनंतर लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले व टोल देखील बंद राहिला असे प्रसिद्धीपत्रक मंत्री आबिटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आले आहे.
=================
Friday, July 18, 2025
Thursday, July 17, 2025
आजरा तालुकावासियांच्या विरोधानंतरही टोलचे भूत मानगुटीवर; संकेश्वर-बांदा महामार्गावर आजऱ्याजवळ टोल वसुली शुक्रवारपासून सुरू
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
संकेश्वर-बांदा महामार्गामधील संकेश्वर ते आंबोली दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आजरा शहराजवळ टोलनाका उभारण्यात आला होता. या ठिकाणी टोल वसुलीला आजरा तालुकावासियांनी जोरदार विरोध केला होता, मात्र तालुकावासियांचा हा विरोध डावलून शुक्रवार (दि. 18 जुलै) पासून या टोलनाक्यावरून टोल वसुली सुरुवात होणार आहे. यामुळे तालुकावासियात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संकेश्वर-बांदा महामार्गामधील संकेश्वर ते आंबोली दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले आहे. 61 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या बांधकामासाठी सुमारे 290 कोटी रुपयांचा खर्च आला. जयपुर स्थित कंपनीने हे बांधकाम पूर्ण केले. त्याचवेळी आजरा एमआयडीसी जवळ टोल नाका उभारण्यात आला. त्यामुळे टोलचे भूत आजरा तालुकावासियांच्या मानगुटीवर बसणार हे स्पष्ट झाले होते. याला तालुक्यातील जनतेने प्रचंड विरोध केला. आजरा शहरात बंद पुकारून विराट मोर्चा काढला, रास्ता रोको करण्यात आले, निदर्शने देखील करण्यात आली. त्यावेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जनतेला विश्वासात घेऊन टोलबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. मात्र गुरुवार (दि 17 जुलै) च्या विविध दैनिकात महामार्गावरील आजरा टोल नाक्याचे दरपत्रक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जाहीर केले. या माध्यमातून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तालुकावासियांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे. यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे.
नव्याने तयार झालेल्या संकेश्वर आंबोली महामार्गावरून जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आता या मार्गावर टोल वसुली सुरू होणार असल्यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. या टोलनाक्यावरून आजरा तालुक्यातील वाहनधारकांना सवलत मिळावी अशी मागणी जनतेची होती. मात्र जाहीर करण्यात आलेल्या दर तालुक्यातील जनतेला कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या आजरा शहरापासून या टोल नाक्यानंतर सुमारे 15 किलोमीटरच्या परिघात तालुक्यातील अनेक गावे समाविष्ट आहेत. तसेच साखर कारखाना देखील आहे. तालुक्यातील जनता साखर कारखान्याचे निमित्ताने तसेच विविध कारणासाठी तालुक्यातील या गावात ये-जा करत असते. त्यांनाही आता टोलचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मात्र गेल्या एक दीड वर्षाच्या कालावधीत तालुक्यातील जनतेने टोलविरोधी तीव्र भावना व्यक्त करून ही प्रशासनाने शुक्रवारपासून टोल सुरू करण्याची घेतलेली भूमिका ही तालुक्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असंच म्हणावे लागेल. यातून संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर नेमकी कोणती भूमिका घेणार?
जून 2024 मध्ये आजरा तालुक्यातील नागरिकांनी विराट मोर्चा काढत टोलला कडाडून विरोध केला होता. या मोर्चात तत्कालीन आमदार व सध्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी आजरेकर नागरिक टोल देणार नाहीत. टोल बाबतीत केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका बोलून दाखवली होती. मात्र त्यानंतर वर्षभरात या भागाचे लोकप्रतिनिधी असूनही मंत्री आबिटकर यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता टोल सुरू झाल्यानंतर मंत्री आबिटकर यांची नेमकी काय भूमिका असणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
ती बैठक अजूनपर्यंत झालीच नाही...
टोलविरोधी निघालेल्या विराट मोर्चाच्या वेळी तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी टोलबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता टोल सुरू होत असताना अजून पर्यंत ती बैठक झालेली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम?
आजऱ्याजवळील टोलची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. आगामी काही दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या टोलचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
महामार्गावर सुविधांची वाणवा...
महामार्गावर टोल वसुलीची गडबड सुरू असताना महामार्गाचे बांधकाम पूर्ण होऊन वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतरही महामार्गावर सुविधांची वानवाच आहे. एकही स्वच्छतागृह उभारले गेले नाही. प्रत्येक गावात तसेच तिच्यावर उभारण्यात आलेले पिकपशेड गैरसोयीचेच ठरत आहे.
लोकप्रतिनिधींची भूमिका गुलदस्त्यात...
आजरा तालुक्याला तीन आमदार आहेत. यापैकी दोन राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आहेत. टोल आंदोलन ज्यावेळी भडकले, त्यावेळी विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या. त्यामुळे तत्कालीन लोकप्रतिनिधींनी टोलविरोधी लढ्यात आपण जनतेबरोबर असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
टोलला विरोध....
संकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समिती व शिवसेना ठाकरे गट यांच्यावतीने टोल वसुलीला विरोध दर्शवण्यात आला आहे. टोल वसुली करण्यात येऊ नये याबाबतचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आजर्याच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे. तर टोलमुक्ती संघर्ष समितीने शुक्रवार (दि. 18) रोजी सकाळी आठ वाजता कार्यकर्त्यांनी टोलनाक्याजवळ उपस्थित राहून टोल वसुलीला विरोध करावा असे आवाहन केले आहे.

सहकार मजबुतीकरणासाठी गोकुळला सर्वतोपरी सहकार्य; सहकार, आरोग्य आणि युवकांच्या विकासाठी ‘गोकुळ’सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
सहकार व दुग्ध व्यवसाय क्षेत्रात गोकुळ सारख्या संस्थेचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ते अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालय मार्फत आवश्यक ते सहकार्य गोकुळला भविष्यात केले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी पुणे येथे केले. स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक पुणे लिग कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री मोहोळ बोलत होते. यावेळी नविद मुश्रीफ यांची गोकुळच्या चेअरमनपदी निवड झालेबद्द्ल मंत्री मोहोळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन मुश्रीफ यांनी गोकुळच्या कामकाजाची माहिती दिली व मंत्री महोदयांना गोकुळच्या भेटीसाठी निमंत्रण दिले.
यावेळी बोलताना मंत्री मोहोळ म्हणाले, दूध, आरोग्य आणि खेळाडू याचा परस्परसंबंध अधोरेखित करत खेळाडूंनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दुधासारखा गुणवत्तापूर्ण सकस आहार घ्यावा व युवकांनी, विद्यार्थ्यांनी आणि क्रीडापटूंनी त्याचा नियमित वापर करावा. सहकार, आरोग्य आणि युवक या तिन्ही क्षेत्रांच्या विकासाठी गोकुळ सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड असून खेळाडू, महिला व युवकांसाठी दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करून देण्याचे आमचे वचन आहे. गोकुळचे दूध हे केवळ दर्जेदारच नाही तर नैसर्गिक पोषणमूल्यांनी भरलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक खेळाडूंना गोकुळ दूधाचा लाभ मिळावा. केंद्र सरकारकडून सहकार्याची ग्वाही मिळाल्याने अशा उपक्रमांना चालना मिळेल. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नसून, तरुणांना व्यासपीठ, शिस्त आणि संघभावना देणारा एक उपक्रम आहे. या कार्यक्रमात क्रीडाप्रेमींसोबत स्थानिक सहकारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक बाबुराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँगेसचे शहर अध्यक्ष समीर चांदेरे व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर यांनी केले होते. यावेळी सुभाष जगताप, प्रमोद भानगिरे, सुनिल चांदेरे, नासिर सय्यद, अर्जुन शिंदे, माणिक गांधीले, सोमनाथ धनकुडे, आप्पासाहेब दळवी, विश्वनाथ पाटोळे, नंदकुमार जाधव, रामदास धनकुडे, संतोष भुजबळ, रामदास चाळणकर, किरण चांदेरे व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
===================

Monday, July 14, 2025
आजरा जिल्हा परिषदेचे दोन गट तर पंचायत समितीचे चार गण, जाणून घ्या पंचायत समिती मतदार संघ निहाय गावे
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
बहुचर्चित व बहुप्रतिक्षित कोल्हापूर जिल्हा परिषदेची प्रारूप प्रभाग रचना अखेर जाहीर झाली. यामध्ये आजरा तालुक्यातील एक जिल्हा परिषद गट तर दोन पंचायत समिती गण कमी झाले आहेत. गतवेळी जिल्हा परिषदेचे तीन गट व पंचायत समितीचे सहा गण असणाऱ्या आजरा तालुक्यात आता दोन गट व चार गण असणार आहेत. नव्या रचनेनुसार उत्तूर व पेरणोली हे दोन गट तर उत्तूर, भादवन, पेरणोली वाटंगी हे चार गण असणार आहेत. उत्तुर गटात उत्तुर (16 गावे) व भादवण (22 गावे) हे गण तर पेरणोली गटात पेरनोली (32 गावे) व वाटंगी (28 गावे) हे गण असणार आहेत. जाणून घ्या पंचायत समिती मतदार संघ निहाय गावे पुढील प्रमाणे :
उत्तूर पंचायत समिती मतदारसंघ : उत्तुर, पेंढारवाडी, मुमेवाडी, महागोंड, महागोंडवाडी, चव्हाणवाडी, धामणे, आर्दाळ, वडकशिवाले, बहिरेवाडी, बेलेवाडी हुबळगी, हालेवाडी, होन्याळी, झुलपेवाडी, कर्पेवाडी दुमाला, चिमणे.
भादवण पंचायत समिती मतदारसंघ : भादवण, पेद्रेवाडी, मडिलगे, मासेवाडी, चांदेवाडी, जाधेवाडी, वझरे, भादवणवाडी, हाजगोळी बु, हाजगोळी खु, सरोळी, सुलगांव, सोहाळे, बाची, निंगुडगे, खेडे, मुंगुसवाडी, खोराटवाडी, कानोली, हारूर, कोवाडे, गजरगांव.
पेरणोली पंचायत समिती मतदारसंघ : पेरणोली, कुरकुंदे, पारपोली, पोळगांव, मसोली, शेळप, देऊळवाडी, देवर्डे, देवकांडगांव, विनायकवाडी, दाभिल, लाटगांव, सातेवाडी, किटवडे, आंबाडे, यरंडोळ, आवंडी, इटे, वेळवट्टी, पेठेवाडी, पारेवाडी, हरपवडे, हाळोली, मेढेवाडी, दर्डेवाडी, सुळेरान, साळगांव, कासारकांडगांव, खानापूर, कोरिवडे, गवसे, आल्याचीवाडी.
वाटंगी पंचायत समिती मतदारसंघ : वाटंगी, मोरेवाडी, मलिग्रे, कागिनवाडी, मेंढोली, बोलकेवाडी, सावरवाडी, चाफवडे, लाकुडवाडी, शिरसंगी, यमेकोंड, चितळे, जेऊर, भावेवाडी, किणे, केरकबोळ, बुरुडे, मुरूडे, हत्तिवडे, होनेवाडी, सरंबळवाडी, सुळे, श्रृंगारवाडी, उचंगी, कोळिंद्रे, पोश्रातवाडी, रेडेवाडी, हांदेवाडी.
==================

साळगाव उपसरपंचपदी बबन भंडारी यांची निवड
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
साळगाव (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बबन रामा भंडारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच धनंजय पाटील निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते. उषा नावलकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर बबन भंडारी यांची निवड करण्यात आली आहे. उपसरपंच पदासाठी बबन भंडारी यांचे नाव उषा नावलकर यांनी सुचविले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कुंभार, विजय कांबळे, कमल केसरकर, स्वप्नाली केसरकर, पूजा पाटील, माजी सैनिक विश्वास व्हळतकर, मधुकर कुंभार, ग्रामसेविका कांचन चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक सुनील पुजारी यांनी आभार मानले.
===============

Friday, July 11, 2025
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत स्वरा स्वाती प्रशांत गुरव शहरी विभागात राज्यात चौदावी
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क :
फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक [इयत्ता पाचवी] शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लजची विद्यार्थिनी स्वरा स्वाती प्रशांत गुरव हिने शहरी विभागात महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये चौदावा क्रमांक पटकावून नेत्रदीपक यश संपादन केले.
याचबरोबर स्वराने 2024- 2025 या शैक्षणिक वर्षात विविध राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धापरीक्षांमध्ये सुयश संपादन केले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत राज्यात प्रथम, गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात द्वितीय, मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत राज्यात प्रथम, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या श्री रामानुजन गणित प्राविण्यपूर्व, गणित प्राविण्य, गणित प्रज्ञा परीक्षेत बेस्ट 25 विद्यार्थ्यांमध्ये निवड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलंपियाड परीक्षेत गुणवत्ताधारक, सुपर सायन्स अकॅडमी व शिक्षण विभाग पंचायत समिती गडहिंग्लज सराव परीक्षेत तालुक्यात तृतीय, भारती विद्यापीठ पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत इंग्रजी व गणित विषयात बक्षीसपात्र, व्ही. के. चव्हाण-पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज कार्वे आयोजित सामान्यज्ञान स्पर्धापरीक्षेत सहावी, ज्ञानामृत शैक्षणिक व्यासपीठ नेसरी सरसेनापती प्रतापराव गुजर सामान्यज्ञान परीक्षेत जिल्ह्यात तृतीय, महाराष्ट्रातील बहुचर्चित सामान्यज्ञान परीक्षा रायझर्स ट्रॅक फाउंडेशन, महाराष्ट्र सामान्यज्ञान परीक्षेत द्वितीय असे विविधअंगी परीक्षेत तिने यश संपादन केले आहे. स्वराला छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हादसिंह शिलेदार, मार्गदर्शक शिक्षिका मीरा खोपकर, निवेदिता बाबर, सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन लाभले.
=========================

Monday, July 7, 2025
‘गोकुळ’च्या वासरू संगोपनातून दुग्ध व्यवसायास नवे बळ : गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
दुग्ध व्यवसायाचा पाया बळकट करण्यासाठी गोठा व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि स्थानिक स्तरावर पशुधनाची गुणवत्ता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. "प्रगत गोठा, समृद्ध गोकुळ" या संकल्पनेतून गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सुरुपली (ता. कागल) परिसरातील गोकुळ संलग्न प्रगतशील दूध उत्पादक, गोठा भेट कार्यक्रमाअंतर्गत शहाजी पांडुरंग पाटील यांच्या गोठ्याला भेट दिली. यावेळी संघाचे अधिकारी, संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक उपस्थित होते.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “जातिवंत रेड्या-पाड्यांची वाढ आपल्या गोठ्यांमध्येच होणे ही दुग्ध व्यवसायासाठी मोठी गोष्ट आहे. बाहेरून जनावरे खरेदी करण्याऐवजी आपल्या पशुधनाची गुणवत्ता स्थानिक पातळीवर वाढवणे हे गोकुळचे उद्दिष्ट आहे. तसेच गोठा चांगला असेल, जनावरांची योग्य काळजी, स्वच्छता, योग्य आहार, संगोपन आणि मोकळं वातावरण असेल, तरच जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. म्हणूनच, गोकुळकडून 'मुक्त गोठा' हि संकल्पना राबवली जात आहे. यासाठी संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘वासरू संगोपन’ व ‘मुक्त गोठा’ या योजनेमध्ये सहभाग घ्यावा व दूध वाढीस हातभार लावावा. या गोठा भेटीत गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, बिद्री साखर कारखान्याचे संचालक रंगराव पाटील, विकासराव पाटील, निलेश शिंदे, मयूर आवळेकर, बाळासो लाटकर, पी. जे. पाटील, बी. एस. पाटील तसेच गोकुळचे विस्तार अधिकारी राहुल घाटगे व रणजित शिंदे उपस्थित होते.

Sunday, July 6, 2025
बा विठ्ठला... बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे; आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न
पंढरपूर, न्यूज नेटवर्क :
पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या सोबत तर वारकरी आलेच परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असे त्यांनी सांगितले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्या सोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करतांना नवी ऊर्जा मिळते. वारीने खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे असे सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा फडणवीस यांनी व्यक्त केली. निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगला आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्याने कुठेही अस्वच्छता पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारी सोबत हरित, पर्यावरण पूरक वारीदेखील झाली. खऱ्या अर्थाने आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे तो या वारीमध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रस्तावित केले. यामध्ये यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये शासन व जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी वर्ग समाधानी असून वारकऱ्यांची संख्या वाढली आहे व त्यावर योग्य नियंत्रण ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी मु.पो. जातेगांव ता. नांदगांव जि. नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते महापुजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक - श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक १३, जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा. द्वितीय क्रमांक - श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक १९, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. तृतीय क्रमांक - श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक २३, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.
===================
===================
Friday, July 4, 2025
आंबेओहोळ प्रकल्पातील शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पातील सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावा, अशा सूचना देऊन या प्रकल्पातील शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, भूसंपादन अधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवाजीराव भोसले, उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे व प्रसाद चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले तसेच संबंधित अधिकारी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशा सूचना देऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी संकलन दुरुस्तीची सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रलंबित विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सद्यस्थितीची माहिती दिली.
====================

Thursday, July 3, 2025
गोव्यात ‘गोकुळ’च्या गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा वाढवण्यासाठी संयुक्त सहकार्य : गोवा मुख्यमंत्री ना. डॉ. प्रमोद सावंत, गोकुळ व गोवा मिल्क फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्धजन्य पदार्थांचा स्थिर व दर्जेदार पुरवठा सुनिश्चित करण्याबाबत चर्चा
पणजी, न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री ना. डॉ. प्रमोद सावंत यांची पणजी (गोवा) येथील मुख्यमंत्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली असता गोकुळच्यावतीने मान. मुख्यमंत्री महोदयांचा कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ व गोकुळची दुग्ध उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ हे अत्यंत गुणवत्तापूर्ण आहेत. गोव्यातील नागरिक तसेच पर्यटकांना गोकुळच्या उत्पादनांचा लाभ मिळावा यासाठी गोवा मिल्क फेडरेशन आणि गोकुळ यांच्यामार्फत काही संयुक्त कार्यक्रम राबविण्यात येतील. शासनाच्या वतीने सहकार्य व मार्गदर्शन निश्चित केले जाईल. या चर्चेत गोकुळ व गोवा मिल्क फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गोवा राज्यात गाय दुधाचे मूल्यवर्धित दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जेदार व स्थिर पुरवठा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्याची रूपरेषा तयार करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. सद्यःस्थितीत गोव्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात असून, त्या तुलनेत नियमित व गुणवत्तापूर्ण पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे गोकुळसारख्या गुणवत्ताधिष्ठित संस्थेच्या सहकार्याने ही तफावत भरून काढली जाऊ शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच, गोवा राज्य शासनाच्या मध्यान्ह भोजन योजनेत विद्यार्थ्यांना गाय दूध पावडर किंवा दुधाचा समावेश करण्याबाबत, तसेच गोवा राज्यातील शेती उत्पन्न बाजार समिती (ए.पी.एम.सी.) मार्फत गोकुळचे गाय दूध थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याबाबत, सध्या दुधावर आकारल्या जाणाऱ्या करात सवलत मिळावी यासंदर्भातही चर्चा झाली.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोव्यासारख्या प्रगत आणि जागरूक राज्यात गोकुळचे उत्पादने पोहोचवणे ही केवळ व्यवसायिक संधी नसून, गुणवत्तेची बांधिलकीही आहे. गोवा राज्य शासनाने दिलेले सहकार्य आम्हाला अधिक प्रेरणा देणारे आहे. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले तसेच सचिन पाटील, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.

Wednesday, July 2, 2025
गडहिंग्लजला प्रशासकीय भवन इमारत बांधण्याचा मार्ग झाला मोकळा, पशुसंवर्धन विभागाची ७५ गुंठे जागा मिळणार महसूल विभागाला; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने मुंबईतील बैठकीत यश
कोल्हापूर जिल्ह्याचा उपजिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडहिंग्लज शहराला प्रशासकीय इमारतीची फार मोठी गरज होती. परंतु 1960 पासून जागेचा प्रश्न भिजत पडला होता. बुधवारी मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा प्रश्न निकालात निघाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गडहिंग्लज शहरात आजरा रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची १२२ गुंठे जागा आहे. त्यापैकी ४७ गुंठे जागा पशुसंवर्धन विभागाला ठेवून उर्वरित ७५ गुंठे जागेवर प्रशासकीय भवन बांधकामाचे आरक्षण होते. मुंबईतील आजच्या बैठकीत ही जागा प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. प्रशासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध करणे आणि त्यावरती नियोजन विभागामार्फत इमारत बांधणे, हाच या बैठकीचा मुख्य विषय होता.
नागपूर अधिवेशनात होणार बजेटची तरतूद.....!
या बैठकीतच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांना येणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बजेटची तरतूद करण्याचे आदेश दिले. तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब हजारे यांना ताबडतोब अंदाजपत्रक तयार करण्याचे आणि गडहिंग्लज शहरातील सर्वच सरकारी कार्यालय प्रशासकीय भवनामध्ये समायोजित होतील, अशा पद्धतीचा चांगला व्यापक आराखडा तयार करण्याच्याही सूचना दिल्या.
अजितदादा आणि पंकजाताईंचे मंत्री मुश्रीफ यांनी मानले आभार.....!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लजच्या प्रशासकीय भवन इमारतीच्या जागेचा विषय उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी गांभीर्याने घेतला. तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे आणि त्या विभागाचे सचिव डाॅ. रामा स्वामी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले.
या कार्यालयांना मिळणार हक्काची इमारत......!
प्रशासकीय भवनाच्या बांधकामानंतर पुढील कार्यालयांना मिळणार स्वतःची हक्काची इमारत. यामध्ये गडहिंग्लज- चंदगड प्रांताधिकारी कार्यालय, आजरा चंदगड पोलीस उपाधीक्षक कार्यालय, उत्पादन शुल्क कार्यालय, गडहिंग्लज तहसीलदार, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार विभाग, वैधमापन विभागाचे वजनकाटे निरीक्षक, तलाठी कार्यालय या सर्व कार्यालयांचा समावेश आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, वित्त विभागाचे सचिव ओ. पी. गुप्ता, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डाॅ. रामा स्वामी, नियोजन विभागाचे सचिव डाॅ. राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि निवासी जिल्हाधिकारी संजय तेली हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले. तसेच नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवानंद ढेकळे, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, माजी नगराध्यक्ष बसवराज खनगावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, युवक शहराध्यक्ष रामगोंडा उर्फ गुंडेराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर, माजी उपनगराध्यक्ष हरून सय्यद, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष महेश सलवादे, रचना सहाय्यक विशाल बेंडखळे, विनोद बिलावल आदी प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
=============
Subscribe to:
Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...