Friday, July 11, 2025

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत स्वरा स्वाती प्रशांत गुरव शहरी विभागात राज्यात चौदावी

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क :
फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक [इयत्ता पाचवी] शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लजची विद्यार्थिनी स्वरा स्वाती प्रशांत गुरव हिने शहरी विभागात महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये चौदावा क्रमांक पटकावून नेत्रदीपक यश संपादन केले.

याचबरोबर स्वराने 2024- 2025 या शैक्षणिक वर्षात विविध राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धापरीक्षांमध्ये सुयश संपादन केले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत राज्यात प्रथम, गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात द्वितीय, मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत राज्यात प्रथम, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या श्री रामानुजन गणित प्राविण्यपूर्व, गणित प्राविण्य, गणित प्रज्ञा परीक्षेत बेस्ट 25 विद्यार्थ्यांमध्ये निवड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलंपियाड परीक्षेत गुणवत्ताधारक, सुपर सायन्स अकॅडमी व शिक्षण विभाग पंचायत समिती गडहिंग्लज सराव परीक्षेत तालुक्यात तृतीय, भारती विद्यापीठ पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत इंग्रजी व गणित विषयात बक्षीसपात्र, व्ही. के. चव्हाण-पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज कार्वे आयोजित सामान्यज्ञान स्पर्धापरीक्षेत सहावी, ज्ञानामृत शैक्षणिक व्यासपीठ नेसरी सरसेनापती प्रतापराव गुजर सामान्यज्ञान परीक्षेत जिल्ह्यात तृतीय, महाराष्ट्रातील बहुचर्चित सामान्यज्ञान परीक्षा रायझर्स ट्रॅक फाउंडेशन, महाराष्ट्र सामान्यज्ञान परीक्षेत द्वितीय असे विविधअंगी परीक्षेत तिने यश संपादन केले आहे. स्वराला छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हादसिंह शिलेदार, मार्गदर्शक शिक्षिका मीरा खोपकर, निवेदिता बाबर, सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन लाभले.
=========================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...