Saturday, April 19, 2025

सोमवारी आजऱ्यात होणाऱ्या वारकरी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
सोमवारी २१ तारखेला आजरा येथे वारकरी संप्रदायाच्या मेळाव्याचे आयोजन केले असून तालुक्यातील वारकरी मंडळींनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रमिक पतसंस्थेच्या माडीवर मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी कॉ. संपत देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली.

सुरवातीला गौरोजी सुतार महाराज यांनी स्वागत आणि प्रास्तविक करून मेळावा का घेणार आहोत याची माहिती सांगितली. गेले वर्षभर आजरा तालुका वारकरी मंडळ तालुक्यात कार्यरत आहे. रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्था स्थापन केली असून या संस्थेची पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी मेळावा होत आहे. तयारीसाठी तालुक्यातील सर्वच गावात वारकरी मंडळींच्या सभा बैठका झाल्या आहेत. बैठकीला पांडुरंग जोशीलकर, हभप संतु महाराज यांच्यासह मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मेळावा आनंदराव नांदवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्था आंबोली रोड आजरा यांच्या सभागृहात होणार सोमवारी २१ तारखेला ठीक ११.०० वाजता होणार आहे. सर्वानी मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
=============

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...