Friday, April 18, 2025

प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच खेडगे ते किटवडे व्हाया आंबाडे रस्त्याच्या कामाचा निर्णय, आजरा तहसील कार्यलयात बैठक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुक्यातील खेडगे ते किटवडे व्हाया आंबाडे रस्त्याचे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चालू होते. शेतकऱ्यांनी याबाबत कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली आजरा तहसीलदार यांना निवेदन देऊन आपल्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाल्याखेरीज रस्त्याचे काम करु देणार नाही असे सूचित केले होते. शनिवारी अंबाडे व लिंगवाडी येथील शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर आजरा तहसील कार्यलयात बैठक झाली.
    
हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होत असल्याने याला संपादन नाही. त्यामुळं कांही शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होणार आहे. त्याऐवजी रस्त्याची रुंदी कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या रस्त्यामुळे पावसाळ्यातील पाट पाण्याचे मार्ग बंद होणार आहेत, त्याचा सर्व्हे करून ते पूर्ववत चालू राहतील असे करून देणे. शेतकऱ्यांच्या पाईपलाईन ज्या उखडल्या जातील त्या पूर्ववत बसवून देणे याबाबत शनिवारी (दि.१९ ) रोजी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन स्थळ पाहणी करूनच निर्णय करावा असे ठरले. यावेळी उपअभियंता अविनाश वायचळ, शाखा अभियंता प्रशांत पाडकर याच्यासह श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, विष्णू पाटील, सहदेव प्रभू यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...