आजरा, विकास न्यूजसेवा :
महिलांना होणारा कॅन्सर आणि त्यामुळे होणारे मृत्यू, ही गंभीर बाब आहे. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही महिलेचा कॅन्सरने मृत्यू होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाची नवी मोहिम राबविणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख महिलांना देण्यात येणार आहे. तसेच दुर्बीणच्या माध्यमातून होणाऱ्या शस्त्रक्रिया शंभर टक्के जिल्ह्यातच करण्याचा संकल्प केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते मडीलगे (ता. आजरा) येथे सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी मंत्री मुश्रीफ यांची सहाव्यांदा आमदारपदी व नवव्यांदा मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल मडिलगे ग्रामस्थ, हनुमान संस्था समूह, भावेश्वरी संस्था समूह, भाग्यलक्ष्मी महिला संस्था समूह, आजी -माजी सैनिक संघटना, गणेशोत्सव मंडळ, ग्रामपंचायत यांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला .
माजी उपसरपंच सुशांत गुरव यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात सरपंच बापू निऊंगरे यांनी गावात झालेल्या विकासकामांची कामांची माहिती दिली. पांडवकालीन रामलिंग मंदिराचा क वर्ग पर्यटन स्थळामध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून समावेश झाल्याचे सांगितले. तसेच गावात शाळा, सभागृह, पाणंद रस्ते डांबरीकरण यासाठी विकासनिधी, वाढीव गावठाणचा सीटीसर्व्हे करण्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी मागणी केली.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधातील चक्रव्यूह सामान्य मतदारांच्या सहकार्याने भेदला आहे. विधानसभा निवडणूकीत विरोधकांनी केलेल्या विषारी अपप्रचाराला जनता बळी पडली नाही, म्हणूनच मी आज तुमच्यासमोर मंत्री म्हणून उभा आहे. विविध खात्याचे मंत्री म्हणून राज्यात केलेल्या कामाचा आढावा घेतला. आरोग्यसेवा, बांधकाम कामगार योजना या योजनांमधून दिल्या जाणाऱ्या लाभांची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली. बांधकाम कामगार केंद्रांची संख्या वाढवून लोकांची गैरसोय दूर करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आरोग्याची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खाते जाणीवपूर्वक मागून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात कोल्हापूर येथील शेंडापार्कात ११०० बेडचे हॉस्पिटल उभारले जात आहे . उत्तूर येथे देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय मंजूर केले आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचा नावलौकिक राज्यात वाढविला आहे. गोकुळचे म्हैस दूध वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कोणतीही योजना बंद होणार नाही कोणीही काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी युवराज येसणे, माजी सभापती दिपक देसाई, तालुका शेतकरी संघाचे नूतन चेअरमन महादेव पाटील धामणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला आजरा साखर कारखाना चेअरमन वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी सभापती विष्णूपंत केसरकर, मारुती घोरपडे, काशिनाथ तेली, के. व्ही. येसणे, भिकाजी गुरव, शिरिष देसाई, पांडूरंग जाधव, सुनील देसाई, ज्ञानदेव पोवार, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, गणपतराव सांगले, सुनील देसाई यांच्यासह ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजी पारळे यांनी सूत्रसंचलन केले. ग्रामपंचायत सदस्या मनिषा काणेकर यांनी आभार मानले.
=========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment