Tuesday, February 11, 2025

अनिकेत चराटी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार : प्रा. अर्जुन आबिटकर; आजरा येथे अनिकेत चराटी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

आजरा, विकास न्यूजसेवा :

आजरा तालुक्याच्या सहकार व शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व स्व. काशिनाथ आण्णा चराटी यांचा वसा व अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक आण्णा चराटी यांचा वारसा घेऊन वाटचाल करणाऱ्या युवा नेते अनिकेत चराटी यांच्या आगामी काळातील सर्व वाटचालीमध्ये त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी केले. ते आजरा येथे युवा नेते अनिकेत चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अण्णाभाऊ आजरा सूतगिरणीचे अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वागत व प्रास्ताविक असिफ पटेल यांनी केले. प्रा. आबिटकर पुढे म्हणाले, अनिकेत चराटी यांच्याकडे आजरा तालुक्याच्या विकासाचे ध्येय आहे. सर्वसामान्य साठी काम करण्याची अनिकेत चराटी यांची धडपड कौतुकास्पद आहे. हिरण्यकेशी स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्य देखील उल्लेखनीय आहे. आजरेकरांची मागणी असलेली नाट्यगृह तसेच नगरपंचायत इमारतीसाठी लवकरच निधी उपलब्ध होईल. अनिकेत चराटी यांनी तळागाळामध्ये काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी. अण्णाभाऊ संस्था समूह तसेच अनिकेत चराटी यांच्या आगामी वाटचालीसाठी सर्वतोपरी सहकार्य राहील. सत्काराला उत्तर देताना अनिकेत चराटी म्हणाले, हिरण्यकेशी स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व सदस्य पाठीशी खंबीरपणे असल्यामुळे मोठी घोडदौड करण्याचे बळ मिळत आहे. आजरा तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा असून आगामी काळात तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे संचालक विजयकुमार पाटील, आजरा अर्बन बँकेचे संचालक डॉ. दीपक सातोस्कर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार, लाटगावचे उपसरपंच रणजीत सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. आजरा हायस्कूलचे शिक्षक के. के.  कांबळे यांनी कवितेच्या माध्यमातून अनिकेत चराटी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, युवक यांनी वाढदिवसानिमित्त अनिकेत चराटी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ अमृते, जनार्दन टोपले, भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, मुग्धा चराटी, राजू होलम राजू पोतनीस, के. व्ही. येसणे, विजय थोरवत, दिनेश कुरुणकर, योगेश पाटील, विनय सबनीस, अभिजीत फडके, अमोल पाटील, मालोजी भोसले, गिरीष मावनूर, पंकज वास्कर यांच्यासह अण्णाभाऊ संस्था समूहाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. डॉ. अशोक बाचुळकर यांनी सूत्रसंचालन केले. राजू दिक्षित यांनी आभार मानले.
=======================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...